Home महाराष्ट्र शेवटी…. पेट्रोलने शतक ठोकलाच भाऊ!….. पेट्रोल कीतिचा टाकू ?….टाक 100 रु...

शेवटी…. पेट्रोलने शतक ठोकलाच भाऊ!….. पेट्रोल कीतिचा टाकू ?….टाक 100 रु आणि लाव चुना

166

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

भारत :- देशात कासवगतीने पेट्रोल दरवाढ सुरुच आहे. काही दिवसांच्या फरकाने देशात इंधनाचे दर वाढविले जात आहेत. यापुर्वी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले होते. त्यानंतर बुधवारी किंमती स्थिर होत्या. परंतु आज (गुरुवार) पुन्हा दर वाढले आहेत.

एप्रिलमध्ये इंधनाचे दर काहीसे कमी करण्यात आले होते. मे महिन्यात आतापर्यंत 15 दिवस इंधन दरामध्ये वाढ झाली आहे. या महिन्याच्या वाढीनंतर पेट्रोल 3.33 रुपयांनी महाग झाले आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर 100 रु. पेक्षा जास्त किंमतीला विकले जात आहे. देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी 6 वाजेपासून लागू होतात.

_*’या’ 15 जिल्ह्यांत पेट्रोलची शंभरी*_

अमरावती 100.49, औरंगाबाद 100.95, भंडारा 100.22, बुलडाणा 100.29, गोंदिया 100.94, हिंगोली 100.69, जळगाव 100.86, जालना 100.98, लातूर 101.22, नंदूरबार 100.45, उस्मानाबाद 100.15, परभणी 102.03, रत्नागिरी 100.53, सातारा 100.12, सोलापूर 100.10, वर्धा 100, वाशिम 100.34, गडचिरोली 101.59, नांदेड 101.47, सिंधुदुर्ग 101.20, यवतमाळ 101.03 या जिल्ह्यात पेट्रोलने शंभरी गाठली आहे.

याशिवाय अहमदनगर 99.37, अकोला 99.55, बीड 99.92, चंद्रपूर 99.97, धुळे 99.61, कोल्हापूर 99.94, मुंबई शहर 99.71, नागपूर 99.70, नाशिक 99.89, पालघर 99.98, पुणे 99.49, रायगड 99.36, सांगली 99.88, ठाणे 99.44, मुंबई उपनगर 99.81 येथे असा पेट्रोलचा भाव आहे.

Previous articleकोजबी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावात सॅनिटायझर फवारणी व नाल्यांचा उपसा करा. दिनेश बनकर प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ जिल्हा संपर्क प्रमुख गडचिरोली यांची मागणी
Next articleचामोर्शी माल येथे कोविड 19 लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद