Home Breaking News आरक्षणाच्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो बघा, 500 पैकी 500 गुण मिळवून सर्वोत्तम किर्तीमान...

आरक्षणाच्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो बघा, 500 पैकी 500 गुण मिळवून सर्वोत्तम किर्तीमान करणारी कु. स्नेहल मारोती कांबळे चे यश दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली बौद्ध विद्याथिनी महाराष्ट्र सरकार व राजकीय पुढाऱ्यांकडुन अजुनही पुरस्कारांपासुन कु. स्नेहल उपेक्षित का ?

739

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत

नांदेड : 1 आँगस्ट 2020
संपुर्ण महाराष्ट्रात नवीन किर्तीमान स्थापित करणाऱ्या कु. स्नेहल मारोती कांबळे हिने दहावीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवून आरक्षणाच्या नावाखाली बोंबा मारणाऱ्या मनुवादी बहुजनांच्या तोंडावर चपराक हाणली आहे. मात्र एवढे दैदीप्यमान व डोळे दिपाऊन टाकणारे एक बौद्ध विद्यार्थिनी अजुनही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र सरकार, विविध राजकीय पुढारी व राजकीय पक्ष यांचेकडुन पुरस्कारांपासुन वंचित का? अजुनही कु. स्नेहल मारोती कांबळे हिने मिळवलेल्या यशाबद्दल महाराष्ट्र भर आर्थिक पुरस्कार व अभिनंदनाचा वर्षाव विविध राजकीय पक्षाकडून होतांना दिसत नाही. हेच यश जर एखाद्या ब्राह्मण किंवा इतर बहुजन मुलीने मिळवले असते तर त्यांचा विविध प्रिंट मीडिया, टीव्ही चैनल वर उदोउदो झाला असता पण कु. स्नेहल मारोती कांबळे ही बौद्ध समाजाची असल्यामुळे तिला उपेक्षित तर ठेवले जात नसावे ही शंका आता उपस्थित होत आहे. आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने, नेत्यांनी किंवा शिक्षण मंत्री किंवा दहावी बोर्ड, जिल्हाधिकारी यांचेकडुन कु. स्नेहल मारोती कांबळे हिला बक्षिसांचा वर्षाव का दिसत नाही हे फार मनाला चटका लावते? काय फुले, शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यात सावित्रीच्या लेकीने मिळवलेले 500/500 मार्क हे इतर बहुजनांच्या तोंडावर चपराक बसवणारे यश तर नाही ना? सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शाळेतुन एवढी उत्तुंग भरारी मारत यश मिळवणाऱ्या कु. स्नेहल ला ना. अशोक चव्हाण यांनी एखादा पुरस्कार दिला काय? येथील राजकीय पुढारी हे आता खरोखरच जातीय व्यवस्थेतून विद्यार्थ्यांचे अभिनंदन तर ठरवत नाही ना?
नांदेडच्या बाबा नगर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या कु. स्नेहल मारोती कांबळे हिने सर्वोत्तम कामगिरी करून 500/ 500 गुण घेत स्वतःची हुशारी व गुणवत्ता चे प्रदर्शन करीत संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
कु. स्नेहल मारोती कांबळे चे वडील मारोती कांबळे हे किनवट येथील आश्रमशाळेत शिक्षक आहेत. आठवड्यातून ते फक्त एक दिवस घरी येतात. मात्र या एका दिवसात त्यांनी घरी येऊन कु. स्नेहल ला शिक्षणासाठी व चांगले यश मिळवण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करायचे. तु हे करु शकते असे वारंवार तिच्या मनावर मारोती कांबळे यांनी बिंबवले होते. नांदेड जिल्हा माहिती कार्यालय तर्फे तिचा सत्कार करण्यात आला होता. तेव्हा तिने बोलताना, आपल्या यशाचे श्रेय हे आपल्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना दिले आहे. वर्षभर शिक्षकांनी ज्या पोटतिडकीने शिक्षणासाठी प्रयत्न केले ती त्यांची मेहनत आणि स्नेहल ची अभ्यासाप्रती असलेला प्रामाणिकपणा व जिद्द यामुळेच आज तिला 100 % यश मिळाले असेही तिने सांगितले.
घरात जेमतेम दोन खोल्या आहेत आणि घरात पोषक शैक्षणिक वातावरण आहे. त्यामुळे या दोन खोल्यात जिथे जागा मिळेल तिथे बसुन स्नेहल अभ्यास करायची. नाही म्हणायला तिने एका विषयाची ट्युशन लावली होती. पण खाजगी ट्युशन पेक्षा शाळेतील शिकवण्या हेच सर्वश्रेष्ठ आहेत आणि तिने आपल्या यशाचे श्रेय हे संपुर्ण शिक्षकांना दिले.

अभ्यासाचे वेळापत्रक बनवले नाही
स्नेहल ने सांगितले की तिने कधीच अभ्यासाचे वेळापत्रक बनवले नव्हते. तिची शाळा दुपारची होती. दिवसभर शाळा करुन आल्यावर ती थकुन रात्री साडे सात आठ वाजता झोपी जायची. तिला दिवसभर अभ्यासाला वेळ भेटत नव्हता. मग स्नेहल पहाटे 2 वाजता उठायची व दिवसभराचा अभ्यास व उजळणी करायची नंतर सकाळी एक ट्युशन करुन शाळेत जायची. फक्त आपल्या मनातून शिक्षणाची तळमळ व जिद्द असली तर आपण यश मिळवु शकतो असे स्नेहल ने सांगितले.
कु.स्नेहल मारोती कांबळे ह्या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवून उत्तुंग कामगिरी करून दाखवलीय. काल वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या आ. बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शनाखाली तिचा व तिच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला.
तसेच पुढील शिक्षणासाठी मनःपुर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता फारुक अहमद , जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, कनिष्क सोनसळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी चे नेते मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी तिचे व तिच्या परिवाराचे हार्दिक अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
तर दुसरीकडे नांदेड जिल्हय़ाचे पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी करुन नांदेड जिल्ह्याचे नाव गौरवान्वित केल्याबद्दल कु. स्नेहल मारोती कांबळे व या शिक्षण संस्थेच्या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे फोनवर अभिनंदन केले आहे.

स्नेहल ला व्हायचे डॉक्टर ; मानसोपचार तज्ञ
कु. स्नेहल मारोती कांबळे हिने यावेळी बोलतांना भविष्यात तिला डॉक्टर व्हायचे आहे तसेच मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करण्याची आपली इच्छा असल्याचे ध्येय सांगितले.

Previous articleआरक्षणाच्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो बघा, 500 पैकी 500 गुण मिळवून सर्वोत्तम किर्तीमान करणारी कु. स्नेहल मारोती कांबळे चे यश दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली बौद्ध विद्याथिनी
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर सभापती ने आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नी सभापतीनां जय भवानी-जय शिवाजी लिहुन शेकडो पोष्ट कार्ड पाटवले