Home चंद्रपूर  लोकनेते नितीनजींचा आदर्श समोर ठेवून सेवाकार्य करा : आ. सुधीर मुनगंटीवार ...

लोकनेते नितीनजींचा आदर्श समोर ठेवून सेवाकार्य करा : आ. सुधीर मुनगंटीवार नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त 9 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे वितरण आतापर्यंत 88 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे वितरण

59

 

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता तिचा सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज राहायचे आहे. आपल्याला जनसेवेसाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे . संकटसमयी मदतीसाठी धावून जाणारा कार्यकर्ता भाजपाचाच कार्यकर्ता असतो अशी आपली ओळख आहे . ही ओळख जपत आपल्याला कार्य करायचे आहे. कोरोना काळात आपले नेते नितीनजींनी सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी जो पुढाकार घेतला तोच आदर्श समोर ठेवून आपणही सेवाकार्य करू , असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 9 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर चे वितरण करण्यात आले. यात प्रामुख्याने दुर्गापूर साठी 3 , जिवती साठी 2 , वरोरा साठी 2, गडचांदूर साठी 2 असे एकूण 9 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर वितरित केले.यावेळी भाजप नेते रामपाल सिंह , हनुमान काकडे, गौतम निमगडे , जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते, दत्ताजी राठोड, तिरुपती कुंडगिर , सुधाकर राठोड , वरोरा येथील भाजप नेते बाबा भागडे, डॉ भगवान गायकवाड , जगदीश तोटावार, गडचांदूर येथील सतीश उपलेंचवार , रामसेवक मोरे , नतथु नक्षीणे यांची उपस्थिती होती.

आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर , बल्लारपूर , मूल , पोम्भूरणा , घुग्गुस , मानोरा , नकोडा , पांढरकवडा, ताडाळी , डॉ हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती आदी ठिकाणी 88 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर वितरित केले आहेत . यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

Previous articleलक्ष्मी नरसिंहाची पालखी मिरवणुकीने नृसिंह जन्मोत्सवाची सांगता
Next articleआमदार सुधिरभाऊ मुंगनटीवार फॅन क्लब तर्फे वाफारा मशीन केले वाटप: श्रीकांत आंबेकर