ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली- दि.२५ मे
चामोर्शी नगर पंचायतीला अखेर अग्निशामक वाहन मिळाले असून चामोर्शी वाशीयांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. अग्निशमन वाहन चामोर्शी नगर पंचायती मध्ये दाखल झाले असून यापुढे चामोर्शी नगरपंचायत ,तालुका व परिसरातील क्षेत्रात नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा मानवी चुकांमुळे लागलेल्या आगीपासून संरक्षण होणार आहे. आतापर्यंत गडचिरोली शहरातूनच अग्निशमन वाहन बोलावून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम चालत असे. यातील अंतर मोठे असल्याने वित्त व जिवहानी होण्याचा धोका अधिक होता. ही बाब लक्षात घेऊन चामोर्शी सारख्या मोठ्या तालुका केंद्रावर अग्निशमन वाहन असावे याकरिता चामोर्शी येथील सुज्ञ नागरिक यांनी पाठपुरावा केला. अखेर आज त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन चामोर्शी नगर पंचायत येथे अग्निशमन वाहन दाखल झाले आहे. त्यांच्या या प्रयत्नांबद्दल चामोर्शी वासियांनी अभिनंदन केले आहे.