ऋषी सहारे
संपादक
देसाईगंज:- दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. लाकडाऊन च्या काळात पोलीस कर्मचारी रात्र दिवस मोलाची कामगिरी बजावत असून २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी तैनात असतात. कोरोना सारख्या माहामारीची कुठलीही पर्वा न करता नागरिकांच्या सेवेत देसाईगंज पोलीस तत्पर आहेत. पोलीस कर्मचाऱ्याच्या कार्याची जाणीव ठेवत देसाईगंज पोलीस स्टेशन येथे वर्षा नांदगावे समाज सेविका यांनी बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधून पोलीस स्टेशन देसाईगंज येथील कर्मचाऱ्यांना स्वतः खीर व नास्ता देऊन बुद्ध पौर्णिमा साजरी केली.