Home यवतमाळ वणी ग्रामिण रुग्णालयात रक्तसाठा केंद्र सुरु करा – निस्वार्थ सेवा २४ तास...

वणी ग्रामिण रुग्णालयात रक्तसाठा केंद्र सुरु करा – निस्वार्थ सेवा २४ तास गृप ची मागणी

69

 

वणी : परशुराम पोटे

वणी शहरात गत ४ वर्षापासून रक्तदान शिबीरांचे आयोजन करून रक्त संकलनाचे कार्य निस्वार्थ सेवा २४ तास रक्तदान गृप हि संस्था चंद्रपूर जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सातत्याने करीत आहे. कारण चंद्रपूर हे वणी पासून अत्यंत जवळ असल्याने व रुग्णाच्या दृष्टीने सोयीचे पडते. परंतु रक्तदान शिबीराचे आयोजन करण्या करीता व रक्ताची साठवणुक करण्या करीता वणी ग्रामिण रुग्णालयामध्ये रक्तसाठा केंद्राची व्यवस्था नाही. त्यामुळे उपलब्ध केलेल्या रक्ताचा वणी विभागातील रुग्णांना फायदा होत नाही व येथील रुग्णाला बाहेरुन रक्ताची व्यवस्था करावी लागते. व कधी कधी रक्ता अभावी रुग्णाचा मृत्यु सुध्दा होतो. त्यामुळे वणी ग्रामिण रुग्णालयात रक्त साठा केंद्राची निर्मिती करावी अशी मागणी निस्वार्थ सेवा २४ तास रक्तदान गृप ने आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हा शल्यचिकित्सक यवतमाळ, स्थानिक आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व वैदयकीय अधिक्षक ग्रामिण रुग्णालय वणी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
वणी हे तालुक्याचे ठिकाण असुन या तालुक्याला झरी जामणी, मारेगांव तालुके संलग्न आहेत हया भागात कोळसा उद्योग, मोठया प्रमाणात असल्याने अपघाताचे सुध्दा प्रमाण मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात प्राणहाणी हया तालुक्यात होत असल्याने व वणी ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक इलाजाची व्यवस्था नसल्याने तसेच रक्तपेढी नसल्याने गंभीर रुग्णाला चंद्रपूर किवा नागपूर येथे स्थालांतरीत करावे लागते व बरेचदा असे गंभीर रुग्ण रस्त्यामध्येच मृत्यु पावतात करीता या समस्येचा गंभीरतेने विचार करून वणी ग्रामिण रुग्णालयात रक्तसाठा केंद्र व रक्त टेक्नीशियनच अत्यंत आवश्यकता असल्याने या करीता शासनाने या ठिकाणी रक्तसाठा केंद्राची निर्मिती करून रक्त टेक्नीशियनचे पद भरण्यात यावे व हया परिसरातील नागरीकांना जिवनदान देण्या करीता या परिसरातील लोकप्रतिनिधी तथा प्रशासकीय यंत्रणेने सहकार्य करून आमची ही मागणी त्वरीत निकाली काढून रुग्णांना जिवनदान देण्याचे महान कार्य करावे अशी मागणी गृप चे अध्यक्ष अमोल धानोरकर, राज चौधरी, विक्की बाप्पावार,निलेश होले,पियुष चव्हाण, हितेश गोडे यांनी केली आहे.

Previous articleलाकॅडाऊन चे काळात धावून आले पत्रकार सामाजिक कार्यकर्ते पूर्णा खोडके
Next articleआनंदराव बावणे गुरुजी यांच्या साहित्याची निवड