Home महाराष्ट्र लाकॅडाऊन चे काळात धावून आले पत्रकार सामाजिक कार्यकर्ते पूर्णा खोडके

लाकॅडाऊन चे काळात धावून आले पत्रकार सामाजिक कार्यकर्ते पूर्णा खोडके

61

 

*अकोट प्रतिनिधी*

कोरोणा चे काळात प्रत्येक नागरिक आप आपल्या परिने अडचणी असलेल्या नागरिकांना मदत करत आहे यामध्ये पोलिस डाक्टर समाजसेवक पत्रकार सुद्धा मदतिचा हात घेऊन समोर येत आहेत, यामध्ये अकोला तालुक्यातील आपातापा येथील जनकराव बोपटे यांचे घर जळुन खाक झाले यामध्ये रोख रक्कमेसह जेवणा खाण्याची साहित्य कागदपत्रे सगळे नष्ट झाले, बरेच दिवस बोपटे परिवार हा उघड्यावर होता. मुर्ती लहान पण कीर्ती महान असे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते पूर्णा खोडके यांनी कोरोणा काळात सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा आदर्श निर्माण करुन. त्यांना मदतीचा हात दिला.गुहु तांदुळ देऊन मदत केली त्यांचे कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.अकोला जिल्हा मध्यें गेले काही दिवसांपासून कडक लाॅकडाउन जाहिर केला यामध्ये सर्व किराणा दुकाने घरपोच सुविधा चालू ठेवली, परंतु नागरिकांचा हाताला काम नसल्यामुळे गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली.अनेकाचे रोजगार ठप्प झाले त्यामुळे पोट पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता.पूर्णा खोडके यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कामामध्ये त्यांना शंकर सनगाडे यांचे सहकार्य मिळाले.

Previous articleकन्हान च्या संजीवनी कोव्हिड केअर सेंटरला त्वरित इतर व्यवस्था उपलब्ध करू – तहसीलदार वरुणकुमार सहारे.
Next articleवणी ग्रामिण रुग्णालयात रक्तसाठा केंद्र सुरु करा – निस्वार्थ सेवा २४ तास गृप ची मागणी