निळापुर येथे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनिने शेतकर्याना दिली बिज उगवण क्षमतेची माहीती

179

 

वणी : परशुराम पोटे

हल्ली खरीप हंगामातील अनेक शेतकऱ्यांचे पीक उगवलेच नाही.त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन हे पीक सबशेल फेल ठरले, यातच पिकाची उगवण क्षमता कशाप्रकारे तपासावी त्याची माहिती व प्रात्यक्षिक मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी माधुरी आवारी हिने तालुक्यातील निळापुर (ब्राम्हण)येथिल शेतकऱ्यांना दिली.
एक आठवडा आधी पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता असलेली तपासणी केली पाहिजे. बियाणांची उगवण क्षमता तपासण्यासाठी आवश्यक आहे . तसेच योग्य वेळी त्याची मात्रा वाढवावी हे ठरविण्यात ही तपासणी मदतदेखील करेल जर बियाणांची उगवण क्षमता ८० % ते ९ ० % पर्यंत असेल , तर चांगले आहे. जर बियाण्याची उगवण क्षमता ६० % ते ७० % पर्यंत असेल , तर पेरणीच्या वेळी त्या बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५० % पेक्षा कमी असेल , तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. कारण आपल्या उत्पादनामध्ये नुकसान होणार नाही. अशी माहीती विद्यार्थीनीने शेतकर्याना दिली. पिक उगवण क्षमतेबद्दल माहीती असावीच असे शेतकर्यानी मत व्यक्त केले तसेच विद्यार्थिनीने बीज उगवण क्षमतेचे विविध प्रकार शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.ए. ठाकरे प्राध्यापक डॉ. प्रतिक बोबडे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच गावातील सरपंच सौ. मंगला ठाकरे शेतकरी संजय चटप, रामचंद्र चिमचोलकर , योगेश कळसकर,शाम पारखी,गोसाई आवारी, वासुदेव चटप, संतोष आवारी ईत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते.