प्रतिनिधी : निलेश आखाडे.
भिवंडी : मौजे लामज गावचे सुपुत्र तथा कोयना पुनर्वसहात मराठा समाज सेवा संघाचे माजी कार्याध्यक्ष तथा माजी उपाध्यक्ष त्याच बरोबर जय शिवराय ग्रुप परिवाराचे प्रमुख आमचे मार्गदर्शक सन्मा.श्री कै सतिशजी चव्हाण साहेब यांचे भिवंडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. एवढ्या कमी वयात अखिल कोयना पुनर्वसहात सेवा संघ तसेच कोयना पुनर्वसहात मराठा समाज सेवा संघ रायगड/ठाणे/पालघर/या सामाजिक संघटनेत आदरणीय कै कृ. ना. मुसळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू वेक्तिमत्व सामाजिक बांधीलकी जपणारे संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.दोन वर्षपुर्वी त्यांनी आपल्या संकल्पनेतून जय शिवराय ग्रुप परिवाराची स्थापना करून सर्व नातेवाईक /मित्रपरिवार/समाजबांधव/सगेसोयरे/वकील/डॉक्टर/पत्रकार/पोलीस अधिकारी अशा विविध सामाजिक क्षेत्रातील अनेक समाज बांधवांना जय शिवराय परिवारामध्ये समाविष्ट करून फार मोठ्या प्रमाणात समाज जोडून सामाजिक विचारांची देवाण घेवाण करून एकमेकांना मार्गदर्शन मिळवत असे. त्याच बरोबर जय शिवराय परिवाराच्या माध्यमातून तिवरे धरण आपघात ग्रस्त लोकांना 50000/-रु मदत /कु.सुजल सावंत तरुण मुलगा (माङोशी)तसेच प्रफुल्ल जाधव अपघात ग्रस्त (आडोशी)या तरुनांना उपचरासाठी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या जय शिवराय व कोयना समाजाच्या माध्यमातून आर्थिक मदत गोळा करून प्रत्येकाच्या सुख दुःखात एक मदतीचा हात पुढे करणारे सामाजिक क्षेत्रातील नियोजन बद्ध काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक आदर्श असे वेक्तिमत्वह
अशा प्रकारे एक तरुण तडपदार नेतृत्व आज अचानक वयाच्या ५४ व्या वर्षी आपण गमावले आहे.समाजातील एक आशावादी चेहरा हरपला आहे.त्यांच्या निधनानंतर चव्हाण परिवारावर, लमाज गावावर , संपूर्ण समाजावर आणि जय शिवराय परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
*दखल न्यूज भारत.*