सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले
भंडारा-जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा येथे भेट दिली. मध्यंतरी भंडारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती गंभीर होती परंतु आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु तिसऱ्या लाटेची तयारी करणे अत्यंत महत्त्वाची आहे.
म्युकरमायकोसिसवर जास्त भर देणे गरजेचे आहेत. सिव्हिल सर्जन यांनी सांगितले की आता म्युकरमायकोसिसचे काही सक्रिय रुग्ण भंडाऱ्या जिल्ह्यात आहेत. परंतु त्या रुग्णांना सर्जरी करण्यासाठी नागपुरला पाठवावेव लागते कारण इथे तशी यंत्रणा उपलब्ध नाही आहे. सर्जरी झाल्यानंतर त्या रुग्णांना भंडाऱ्यातील रुग्णालयात आणले जात आहे. यावेळी श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना केल्या आहेत की, अर्ली डायग्नोसिस कसे होई शकेल आणि यामध्यमातून कशा प्रकारे स्क्रिनींग करुन या रुग्णांना रोगाची लागण होण्यापासून वाचवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. या रोगामध्ये रुग्ण जर पहिले लक्षात आले तर त्यांची प्रकृती चिंताजनक होणार नाही.
रुग्णालयाला भेट दिल्यानंतर एक बाब लक्षात आली आहे की, मागच्या काळात भंडाऱ्यातील याच रुग्णालयात आग दुर्घटना झाली होती. ज्या आगीमध्ये १० बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला १ वर्षाचा कालावधी झाला. आज त्याबाबत माहिती घेतली असता समजते आहे राज्य सरकारने अद्यापही या रुग्णालयात अग्नी सुरक्षा केली नाही. राज्य सरकारचा हा अक्षम्य दुर्लक्षपणा आहे. या गोष्टीकडे लक्ष देण्याची अवश्यकता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी पिडियाट्रिक अशा व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. तसेच ऑक्सिजन प्लांट ची देखील पाहणी केली.
यावेळी श्री चंद्रशेखरजी बावणकुळे, आमदार डॉ परिणय फुके, खासदार श्री सुनिलजी मेंढे, माजी आमदार श्री बाळाभाऊ काशिवार, माजी आमदार श्री चरणभाऊ वाघमारे, जिल्हाध्यक्ष श्री शिवरामजी गि-हेपुंजे, श्री चंद्रकातजी दुरूगकर, श्री संजय कुंभलकर, जिल्हाधिकारी भंडारा, जिल्हा शल्य चिकीत्सक उपस्थित होते.