राजेश बालाजीराव नाईक
जिल्हा प्रतिनिधी, नांदेड
दखल न्यूज/ दखल न्यूज भारत
देगलूर:- नांदेड जिल्ह्यातील देगलूर त्यालुक्याचे राउतवाड यांच्या कडून एका आनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
शब्दांचीच रत्ने या युट्यूब चॅनेल च्या वतीने महाराष्ट्रातील तमाम मराठी कवी/कवयित्री साठी “पाऊसधारा महा ऑनलाइन कवी संमेलन” चे आयोजन करण्यात आले.
शब्दांचीच रत्ने चे संचालक युवा साहित्यिक श्रीपाद राऊतवाड आपल्या आवाज शैलीत कविता सादरीकरणात नेहमी चर्चेत असतात. महाराष्ट्रातल्या नवोदित व जेष्ठ कवीचे कविता त्यांनी शब्दांचीच रत्ने वर सादर केले आहेत. अश्या नवीनविन उपक्रमाने प्रसिद्ध असलेल्या या चॅनेल वर अत्ता महा ऑनलाइन कवी संमेलन हा अनोखा उपक्रमाचे आयोजन केले आहे.
तरी या उपक्रमात महाराष्ट्रातील तमाम कवी/कवयित्रीने जास्तीत जास्त कविता पाठवून सहभाग नोंदवावे असे आवाहन संचालक श्रीपाद राऊतवाड यांनी केलं.
अधिक माहितीसाठी शब्दांचीच रत्ने च्या चॅनेलवर भेट द्यावी.