Home गडचिरोली आमदार डॉ.होळी यांच्या नेर्तृत्त्वात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आंदोलन

आमदार डॉ.होळी यांच्या नेर्तृत्त्वात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आंदोलन

75

 

तालुका प्रतिनिधिः महेश तागडे

गडचिरोली :- आज दि .२५ / ०५ / २०२१ पासुन जिल्यातील धान , मका ऊत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदार डॉ.होळी यांच्या नेर्तृत्त्वात आंदोलन . आंदोलनाच्या पहिल्या दिवशी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चार्मोशी , गडचिरोली , धानोरा या तिन्ही कार्य क्षेत्रातील तहसिलदार व जिल्हाधिकारी यांना शेतकरी बांध वांच्या मागण्यांचे निवेदन देणार आहेत .

२६ मे रोजी ज्या शेतकऱ्यांना आदिवासी विकास महामंडळ व मार्किंटिंग फेडरेशन यांनी धान खरेदी केले त्यांना रक्कम व बोनस मिळाला नाही.त्या शेतकरऱ्याचे धान घेऊनहि सातबारा ऑनलाईन करण्यात आलेला नाही अशा पिडीत शेतकऱ्यांच्या बांधावर , घरी , गावात . धान खरेदी केंद्रावर , महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करीत आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार डॉ.होळी यांनी दिलीआहे .

Previous articleदिनेश कु-हाडे पाटील यांची खेड तालुका वारकरी प्रबोधन सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Next articleनिधन वार्ता:श्री. सचिन रत्नाकरजी सराफ। हिंगणघाट जि.वर्धा यांचे दु:खद निधन