आरमोरी देसाईगंज येथे उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा शेतकऱ्यांचे धान तहशिल कार्यालयात आणुन टाकणार गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा दिला आहे.

180

 

आरमोरी – जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील धानाची कापणी व मळणीला सुरवात झाली असल्यामुळे शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत परंतु मे महीण्याचा सेवटचा हस्ता लागुन ही आरमोरी देसाईगंज येथे धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही पण फक्त शेतकऱ्यांना आशेवर ठेवण्यासाठी सातबारे आँनलाईन करण्यात येत आहे परंतु अधिकचा वेळ धान खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी लागत असल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्याकडे अवाच्या सव्वा कीमतीत विकण्याची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने आरमोरी देसाईगंज येथे दि २ जुन पर्यंत मार्केटींग फेडरेशन च्या वतीने धान खेरदी केंद्र सुरू करण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांचे धान तहशिल कार्यालयात आनण्यात येथील अशा इशाराच गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम च्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे

जिल्ह्यातील आरमोरी देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी विटीयाडोह प्रकल्प व गाढवी नदि व शेतीत विहीर बोअरवेल खोदुन सिंचनाखाली जमिनी आणुन शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून या वर्षी मोठ्या प्रमाणावर अन्हाळी धान पिक हंगामात धानाचे पीक घेण्यात आले विशेष म्हणजे धान हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक असल्याने जिल्ह्याला धानाचे कोठार म्हणूनही संबोधले जाते. खरीप हंगाम आटोपताच शेतकर्‍यांकडून जानेवारी ते फेब्रुवारी या महिण्यात 90 ते 110 दिवसांच्या वाणांच्या धानाची लागवड करण्यात येऊन एप्रिल महिण्याच्या शेवटच्या आठवड्यापासून धान कापणीला सुरुवात करण्यात आली असल्यामुळे आजघडीला दोन्ही तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या शेतातील धानाची कापणी व मळणी झाली असल्याने यावर्षीच्या उन्हाळी हंगामात पावसाळी धानापेक्षा उन्हाळी हंगामात दुप्पट उत्पादन झाले परंतु आता मे महिन्याचा सेवटचा हस्ता लागुन ही आधारभूत धान खरेदी केंद्र कधी सुरु होणार याचीच वाट पाहत असुन आता चार दिवसानी जुनं महीणा लागताच सात तारखेला मिरुग नक्षत्र पासुन पावसाळा सुरु होतो आणी शेतकऱ्यांचे धान घरी सुकविण्यासाठी जागा नसल्यामुळे गल्लोगल्ली रस्तेवर पडुन आहेत पावसाचे पाणी आल्यास शेतकऱ्यांचे धान ओले झाल्यास डबल नुकसान होते त्यामुळे अजुन पर्यंत मार्केटींग फेडरेशन चे आरमोरी देसाईगंज येथे उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने दोन्ही तालुक्यातील उन्हाळी धान पिक घेणारे शेतकरी अडचणीत सापडुन पर्यायानी शेतकरी खाजगी व्यापाऱ्याकडे धाव घेऊन बाराशे ते तेराशे रुपये प्रति क्विंटल मातीमोल कमी भावाने विक्री करण्यास सुरुवात केली आहे त्या मुळे शासनाने दोन जुनं पयत देसाईगंज आरमोरी येथील मार्केटींग फेडरेशन चे उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अन्यथा उन्हाळी धान तहशिल कार्यालयात आनण्यात येथील असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून दिला आहे.
यावेळी उपसरपंच विजय सहारे महादेव सयाम जगन पिलारे मगरु वरखडे आसाराम प्रधान नरेंद्र गजभिये देवनाथ झलके जगन पत्रे आनंदराव खरकाटे. सुनिल कुमरे. उपस्थित होते.