गरीब व गरजूंच्या घरांना ताटपत्री चा आधार सुधिरभाऊ मूनगंटीवार यांच्या जन्म दिवसानिमित्याने अहेरी भाजपाचा पुढाकार…. जिल्हा सचिव ना.संदीपभाऊ कोरेत यांच्या हस्ते वाटप….

133

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम  जनसेवा हीच ईश्वर सेवा या मणी शी एकरूप होणारे विदर्भाचे सुपुत्र श्रीसुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ व नियोजन आणि वनमंत्री यांचा जन्मदिवसा निमित्याने भा ज पा जिल्हा सचिव संदीप कोरेत यांच्या तर्फे गरजूंना ताटपत्रि चे वाटप करण्यात आले..
तालुक्यातील गरजवंताला खासदार अशोकभाऊ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या गरजू लोकांच्या घरात पाणी गळत होते पण हलाखीची परिस्थिती मुळे साधं प्लास्टिक टाकण्याची परिस्थिती नाही होती अश्या निराधार लोकांच्या घरावर प्लास्टिक टाकून त्यांची पावसाळ्याची सोय केली.
ताटपत्री वाटपाचे काम अहेरी तालुक्यातील सन्ड्रा, गोलाकरजी ,कोडसेलगुडम, आणि छलेवाडा या चार ठिकाणी करण्यात आला महत्वाचे म्हणजे सन 2017-018 च्या अतिवृष्टीत सन्ड्रा येथील रमेश पोरतेट यांचे पूर्ण घर जमीनदोस्त झाले होते तेव्हा त्या घराची भिंत रमेश पोरतेट यांचा पत्नी वर पडून त्या गंभीर जखमी झाले होते .ते भूमिहीन असल्यामुळे मजुरी करूनच ते रोज आपलं पोट भरतात . घर बांधण्याची त्यांची परिस्थिती नाही घरात पावसाळ्यात नेहमी पाणी गळत राहते याची माहिती स्थानिक कार्यकर्ते पोशालू सुदरी यांनी संदीप कोरेत याना दिली कोरेत यांनी सुधीरभाऊ यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून गरीब व गरजू कुंटुबाला ताटपत्री वाटपाचा कार्यक्रम घेतले.