113 बटालियन सीआरपीफ धानोरा कडून सावरगाव अंतर्गत मोरचूल येथे विविध वास्तूचे वाटप

40

धानोरा /भाविकदास करमनकर

113 बटालियन सीआरपीएफ, धानोरा, गडचिरोली यांच्या कडून पुलिस मदत केंद्र  सावरगाव अंतर्गत येणाऱ्या ग्राम मोरचुल येथे सिविक एक्शन कार्यक्रम  घेण्यात आला. या कार्यक्रमात स्वयंपाक करण्याचे भांडे पाणी पिण्याचे गिलास आणि मच्छरदाणी गरीब आणि गरजू लोकांमध्ये वितरीत केले गेले. श्री जी. डी. पंढरीनाथ, कमांडंट 113 बटालियन यांच्या मार्गदर्शना मधे श्री धीरज शितोले सहायक कमांडेंट सी/113 बटालियन यांच्या  द्वारे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमा मधे पोमके सावरगांव चे उप निरिक्षक जोनापल्ली व वाघमारे यांच्यासह 113 बटालियन चे जवान व गावातील प्रतिष्टित नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमा मधे गावातील नागरिकांना मास्क देखील वितरित करण्यात आले आणि लोकांना कोरोना महामारीच्या सुरक्षिततेच्या उपायांबद्दल माहिती देण्यात आली. या उपक्रमा बद्दल नागरिकांनी खुप प्रशंसा केली.