खासदार अशोक नेते यांनी घेतले देवटोक येथे उत्खनात निघालेल्या शिवपिंडी चे दर्शन

33

 

सावली ( सुधाकर दुधे )
सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनीच्या काठावर असलेल्या देवटोक येथे काल दिनांक 25 ला सायंकाळी 6 च्या दरम्यान नवीन मंदिर बांधकाम करण्यासाठी कॉलम चे जेसीपी च्या खोदकाम करीत असतानाच जवळपास अंदाजे 5 फूट लांबी व 1 फूट उंच ची पुरातन शिवपिंडी आढळून आली. त्या शिव पिंडी ची विधीवत पूजा करण्यात आली.शेकडो लोकांनी ही शिवपिंडी पाहण्यासाठी गर्दी केली होती. आज दिनांक 26 ला दुपार च्या सुमारास गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी देवटोक येथे भेट देत पाहणी केली व पूजा अर्चना केली.तसेच सभामंडप साठी 15 लाख रुपये देत असल्याची माहिती दिली.यावेळी त्यांच्या समवेत भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल,तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, ग्रा प ससदस्य राकेश गोलेपल्लीवार जिबगांव,नायब तहसीलदार सागर कांबडे,ठाणेदार शिरसाट,श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर देवस्थान ट्रस्ट देवटोक(शिर्शी) चे अध्यक्ष संत मुर्लीधर महाराज,उपाध्यक्ष पत्रुजी चुधरी,सचिव नरेश जकुलवार,सुरेंद्र उरकुडे,सुरज बोम्मावार, पुंडलिक पाल,नामदेव हजारे,भास्कर पोहनकार यावेळी उपस्तीत होते. यावेळी ट्रस्ट च्या वतीने भक्तनिवास बांधकाम साठी निधी मंजूर करावे या साठीचे खासदार अशोक नेते यांना निवेदन दिले.