ग्रामपंचायत कासवी येथे कोरोना लसीकरणसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

97

 

सदाशिव माकडे (प्रतिनीधी)

आरमोरी:-
गटग्रामपंचायत कासवी अंतर्गत मौजा कासवी येथे दिनांक २५/०५/२०२१ ला ४५ वर्षावरील नागरिकांना कोवीड-१९ च्या लसीकरणाचे आयोजन आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार कल्याण कुमार डहाट यांच्या मार्गदर्शनात प्रशासनामार्फत लसीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.
ग्रा.प.कार्यालयाच्या सभामंडपात येथील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला सोबतच कोविड चाचणी सुद्धा भरपूर लोकांनी केली. कोविड पॉझिटीव्ह असलेल्या लोकांना आरमोरी येथील सीसीसी येथे भरती करण्यात आले.
ग्रामपंचायत कासवी अंतर्गत मौजा आष्टा येथे दिनांक २७/०५/२०२१ ला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, तर दिनांक २९/५/२०२१ ला वार्ड क्रमांक ३ रामपूर येथे लसीकरण करण्यात येणार आहे. कासवी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, तलाठी, उमेद महिला, समूह संसाधन व्यक्ती, यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावे असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले. दिनांक २५/५/२०२१ रोजी झालेल्या लसीकरण मोहिमेत ग्रामपंचायतचे सरपंच सतीश गुरनुले, उपसरपंच प्रवीण ठेंगरी, उदाराम दिघोरे ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, नागापुरे तलाठी, आरोग्य कर्मचारी, निंदेकर ग्रामसेवक, आशा वर्कर,कोतवाल,ग्राम रोजगार सेवक,उमेद महिला कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी, कासवी येथील पोलीस पाटील यांनी मोलाचे सहकार्य लाभले.