वणी : परशुराम पोटे
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सोशल डिस्टन्सिंग चे नियम देऊन छोटे मोठे व्यवसाय सुरु करण्याची परवानगी प्रशासनाच्या वतिने देण्यात आली आहेत.परंतु यामध्ये चाय टपरी व पान टपरी धारकांना वगळण्यात आले. यामुळे चाय टपरी धारकांनी चाय टपरी सुरु करण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना दि.५ जुलै रोजी निवेदन दिले आहे.परंतु एक महिना लोटुन गेला तरि यावर काही निर्णय घेण्यात आला नाहि.परिणामी चाय टपरी व पान टपरी धारकांवर उपासमारीची पाळी आली आहे.
एकीकडे शहरात दारुच्या दुकानात प्रचंड गर्दी दिसुन येत आहे तर दुसरीकडे चाय टपरी धारकांना चाय लपुन छपुन विकावी लागत आहे.वणी शहरात सद्याची परिस्थिती पाहता,कापड दुकानात शेकडो ग्राहकांची गर्दी दिसुन येत आहे.तर दारुच्या दुकानांत दारुसाठी ‘तळीरामांची’ झुंबड दिसुन येत आहे.यांच्याकडे प्रशासनाचे लक्ष का नाही?असा प्रश्न उपस्थित करुन चाय टपरी धारकांनी ,साहेब आमच्या चाय टपरीला परवानगी द्या हो.अशी आर्त हाक प्रशासनाला केली आहे.