कुरुड येथे कोरोना लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

144

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यातील कुरुड ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढाकाराने कोरोना लसीकरणाला २५ मे रोजी गावातील पाटील मोहल्ल्यात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण मोहीम राबविण्यात आली.राबविण्यात आलेल्या मोहिमेत गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम यांनी प्रतिनिधीस सांगितले.
सुरुवातीला नागरिक लसीकरण करण्याकरिता घाबरत होते.त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी जनजागृती करून नागरिकांना लसीकरण करण्यासंदर्भात जागृत केले.
यापूर्वी देखील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावातील नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.कोरोना चाचणीमुळे गावातील नागरिकांची नेमकी कोरोना रुग्ण संख्या किती आहे व कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार केले जात असल्याने
सध्यास्थितीत कुरुड ग्रामपंचायतीने कोरोना रुग्ण संख्या कमी होण्यावर विजय मिळविलेला आहे.आता गावामध्ये नगण्य कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.हा विजय ग्रामपंचायत व प्राथमीक आरोग्य केंद्राने केलेल्या सामूहिक प्रयत्नाचा असल्याचे दिसून येते.सध्यास्थितीत धान कापणी सुरू असल्याने बरेच नागरिकांनी पुढील आठवड्यात लसीकरण करणार आहोत असे स्वतःहून सांगितले आहे.
लसीकरण मोहिमेदरम्यान सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम,माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम,डॉ.प्रवीण सडमेक,डॉ.अश्विनी कुथे,औषध निर्माण अधिकारी गिरीधर ठाकरे,दत्तात्रय निमजे एल एस ओ,उईके सिस्टर,फुलबांधे सिस्टर,गेडाम आरोग्य सहाय्यक,कुलसे,प्रशिक्षणार्थी परिचारिका,महादेव ढोरे,पिंटू पारवेकर,रमेश ठाकरे,प्रभाकर उरकुडे,मधुकर लाभे प्रामुख्याने उपस्थित होते.