येरमणार येथे कोविड-१९ लसीकरण जनजागृती कार्यक्रम

44

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:-अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या येरमणार ग्राम पंचायत च्या सभागृहात कोविड-१९ च्या लसीकरण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहे.
अतिदुर्गम, मागासक्षेत्र व शिक्षणाचा अभावामुळे नागरिकांमध्ये लसीबाबत गैरसमज निर्माण झाला होता तसेच लसीबाबतीत शंका व भीतीमुळे नागरिकांनी लस घेण्यास समोर येत नव्हते.ग्रामीण भागात कोविड लसीकरणाबाबत भिन्न भिन्न चर्चे सुरू आहेत.या करिता प्रशासनाने कोविड -१९ च्या लसीकरण मोहिमेची ग्रामीण भागात जनजागृती करण्याचे नियोजन करून येरमणार च्या गावकऱ्यांमध्ये जनजागृती करुन नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करण्याचे प्रयत्न केले आहेत.स्थानिक भाषेचा वापर करीत यासाठी उत्तम मार्गदर्शन केले आहेत.
या जनजागृती कार्यक्रमात पंचायत समिती सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी चेणमवार, ए.बा.वि.से.अधिकारी गाढधे, प्राथमिक आरोग्य पेरमिली चे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुरकर, ग्रा.प.येरमणार चे सरपंच संध्या मडावी, उपसरपंच विजय आत्राम, सचिव नरोटे,तलाठी मडावी, संगणक परिचालक योगेश कोंडागुर्ले अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रा.प.सदस्य यांनी ग्राम पंचायत येरमणार हद्दीतील नागरिकांना कोविड लसीकरण बाबत उत्तम मार्गदर्शन केले.या वेळी ग्रा.प.अंतर्गत येणाऱ्या गांवातील नागरिक उपस्थित होते.