पुणे पोलीस अधिकारी विजय काशिनाथ आंब्रे कविताताई आंब्रे आणि सहकुटुंब यांच्याकडून गरजू कुटुंबांना अन्यधान्य किटचे वाटप

106

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

खेड : गेल्या एक वर्षा पासून कोरोनाच्या महामारीने संपूर्ण देशाला ग्रासले आहे याचा परिणाम अनेकांच्या रोजगारावर झाला आहे.अनेकांना आर्थिक संकटाना सामना करावा लागत आहे ,अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.लॉकडाऊन मध्ये लोकांच्या जीवन शैलीवर विपरीत परिणाम झाला आहे.अशा परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गणवाल कळंबटे वाडी येथील गरजू कुटूंबाना पुणे मधील पोलीस अधिकारी विजय काशिनाथ आंब्रे आणि कविताताई आंब्रे(शिवसेना संघटिका पुणे शहर) व सहकुटुंब यांनी 30 कुटुंबांना अन्न धान्याचे किट वाटप केले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून कुटुंबांना मदत केली.सदर वेळी सुरक्षितेसाठी संपूर्ण स्थानी सनीटायझर करण्यात आले होते. व मास चा वापर करण्यात आलेला होता.

*दखल न्यूज भारत*