जि.प.अध्यक्षांच्या हस्ते इंदाराम येथे समाज मंदिराचे (गोटूल) भूमिपूजन

63

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- आदिवासी समाजाच्या सांस्कृतीक तथा परम्परागत रूढी परंपरा,चालीरीती यांचे जोपसना करण्यासाठी व आदिवासीचे कार्यक्रम घेण्यासाठी समाजाच्या समाजभवन नसल्याने अडचण होत होती
इंदाराम येथे आदिवासी उत्सव समितीच्या जागा उपलब्ध असल्याने सदर जागेवर सांस्कृतीक समाजभवन उभारून दिल्यास समाजाचे कार्यक्रम घेण्यास सोईचे होईल व आम्हाच्या समाजाच्या सांस्कृतीक विकासालाही चालना मिळेल.
या उद्देशाने आदिवासी उत्सव समितीने जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना इंदाराम येतील प्रतिष्टित नागरिकांनी निवेदन देवून समाज भवनाची मागणी केले होते.
निवेदन स्वीकारताना शब्द दिले आहे कि,आपण नेहमीच सर्व समाजाला मदत करत आले असून इंदाराम येते आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने समाज भवन आवश्यक असून मि शब्द देतो कि येत्या काही दिवसांतच समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते.
दिलेले आश्वासन पूर्ण करत जिल्हा परिषदेच्या 13 वने निधी अंतर्गत 15 लाख रुपए मंजूर केले असुन काल सदर समाज भवनाच्या भूमिपूजन जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी अजय नैताम जि. प.सदस्य,वर्षा पेंदाम सरपंच इंदाराम,वैभव कंकडालवार उपसरपंच इंदाराम, गुलाबराव सोयाम माजी सरपंच इंदाराम,मूसली तलांडे, बुदाजी सोयम, बापू सिडाम,अर्जुन सोयाम,दिलीप मडावी,रमेश आत्राम,चंद्रशेखर कोरेत,साई कोरेत,रगु कनाके, नामदेव तलांडे,मदुकर मडावी,उमेश कोरेत,सुगंदा मडावी,सोनी सोयम,सावित्री वेलादी,निर्मला कोरेत,अनिल तलांडे,तेजराव दुर्गे,संतोष कोडापे,प्रशांत गोडशेलवार, राकेश सडमेक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.