कोरचीत मदत कक्ष व संपर्क सेतूचे उदघाटन

95

 

संपादक
ऋषी सहारे

कोरची– येथील ग्रामीण रुग्णालयात आम्ही आमच्या आरोग्यसाठी व अनुसंधान ट्रस्ट यांच्या सहकार्याने मदत कक्ष व संपर्क सेतू चे आज 25 मे मंगळवारला उद्घाटन डॉ राऊत यांच्या हस्ते पार पडले.
ग्रामीण रुग्णालय कोरची येथे आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा व अनुसंधान ट्रस्ट साथी पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कोरची तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा मधील 15 गाव व कोटगुल प्राथमीक आरोग्य केंद्र मधील 15 गाव असे एकुण 30 गाव त्याच प्रमाणे ग्रामीण रुग्णालय कोरची ‌या ठिकाणी मदत कक्ष संपर्क सेतु या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रधानमंत्री मातुत्व वंदना योजना जननी शिशु सुरक्षा योजना तसेच आरोग्य विषय विविध योजना आणि आताच्या महामारी‌ कोरोना तपासणी तथा लसीकरण करण्याविषयी जो समाजात गैर समज आहे त्या विषयी जाणीव जागृती घ्या कार्य गाव पातळीवरील शुरु आहे शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी शासना सोबत समन्वय करण्याचे काम आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संयोजिका शुभदा देशमुख महा ग्रामसभेच्या अध्यक्ष झाडुराम सलामे सल्लागार नंदकिशोर वैरागडे ‌फिल्ड आऊटरीच कांता काटेंगे ‌हेल्पडेस्क‌ कुमारी जमकातन आणि ग्रामीण रुग्णालय कोरची येथील पुर्ण स्टाफ यांचे उपस्थितीने मदत कक्ष संपर्क सेतु च्या उदघाटन करण्यात आले शुभदा ताई नी कामाच्या स्वारुप या विषयी माहिती दिली