बोध भरलेला ट्रक अचानक जळून खाक

206

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

चामोर्शी: तालुक्यातील घोट नजीकच्या वरुड ते गांधीनगर या मार्गावर बोध भरून जाणाऱ्या ट्रक ला रोड वर असलेल्या कमी उंचीच्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने स्पर्किंग होऊन अचानक आग लागली.

सदर घटनेची माहिती पोलीस मदत केंद्राचे चे प्रभारी अधिकारी सपोनी रोंढे साहेब यांना कळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटना स्थळ गाठले तेथील जमलेल्या बघ्याना सुरक्षित ठिकाणी हटवून , त्या नंतर टँकर बोलावून आग आटोक्यात आणण्यात आली परंतु तो पर्यंत ट्रक मधील बोध व ट्रक जळून खाक झाल्याने बरेच नुकसान झाले.

सदर घटनेत ट्रक ड्रायव्हर ने प्रसंगावधान राखून जळता ट्रक गांधीनगर गावाबाहेर नेल्याने मोठे जीवित अथवा मालमत्तेचे नुकसान टळले.

या वेळी घटनास्थळी पोलिस मदत केंद्र घोट सपोनी रोंढे साहेब,पो उप नि श्रीमंगल साहेब,पो.ह.वा दिलीप सोनटक्के,ना.पो.शी दिवाकर बोबाटे,राहुल पठारे व गांधीनगर येथील नागरिक उपस्थित होते
घटनेचा पुढील तपास घोट पोलीस करीत आहे.