जनतेच्या मनात असलेल्या कोरोना लस घेण्यासाठी भीतीबाबत जनजागृती

91

 

ऋषी सहारे
संपादक

गडचिरोली-
आज दि.२५/५/२०२१ ला महाएनजीओ फेडरेशन, पुणे यांचे सहकार्याने आणि अभिनव बहुद्देशीय कला मंच गडचिरोली यांचे वतीने श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमात कोविड-१९ महामारीत कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे, परंतु लसीकरणाबाबत लोकांच्या मनात असलेली भिती नाहीशी करण्यासाठी आणि लोकांना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करणे याकरिता Vaccination centre मध्ये Vaccination Selfie Point Stand चे उद्घाटन मा.डाॅ.सुनिल मडावी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली तथा तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली यांचे हस्ते रिबीन कापून करण्यात आले, त्यावेळी डाॅ. विनोद बिटपल्लीवार, वैद्यकीय अधिकारी, गडचिरोली डाॅ.अनुपम महेशगौरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, गडचिरोली डाॅ.वंदना पेद्दीवार, ओरविल वडीचर,अकिल शेख, सचिव-अभिनव बहुद्देशीय कला मंच,प्रकाश मोहीतकर, सहसचिव, नूर खाॅ पठाण, शंकरराव मोगरे, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक गडचिरोली, संस्थेचे कार्यकर्ते मयुर उपस्थित होते. डाॅ. सुनील मडावी यांनी संस्थेच्या कार्याची स्तुती केली.