बापाची ”तिरडी” असता अंगनात, लेक गेली होती परिक्षा केंद्रात…. अशा कठीन परिस्थितीतही सानीकाने यश संपादन करुन.. एक आदर्श घडविला हिवरी गावात… बेटा…सानिका मी तुझ्या घरी येऊन तुझे अभिनंदन करेन!- नाना पटोले (विधानसभा अध्यक्ष)

503

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

यवतमाळ :– बापाची ”तिरडी” अंगनात, ” लेक गेली परिक्षा केंद्रात! यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील कु.सानिका सुधाकर पवार हिने तब्बल ९८ टक्के गुण मिळविले. सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली येऊन सुधाकर पवार या तिच्या वडिलांनी विहीरीत ऊडी घेत स्वतःची जीवन रेखा पुसुन टाकली होती. नेमके त्याच दिवशी अंगणात बापाची तिरडी बांधत असतांना मुलगी सानिका हिचा दहावीचा संस्कृत विषयाचा पेपर होता. आभाळभर दुःखाचं गाठोडं काळजावर झेलत,स्वतःला सानिकाने सावरले. अन् मायेच्या साडीच्या पदराने डबडबलेले डोळे पुसले, दुःखाचा आवंढा गिळत परिक्षा केंद्राची वाट धरली होती.

नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला, तिला संस्कृत विषयात तब्बल १००पैकी १००गुण मिळाले. स्वत:ची बोली भाषा भिन्न असतांना सुध्दा, चिंतन, वाचन, मनन अगदी जिद्द व चिकाटीने केल्यानेच ती या यशाच्या शिखरावर पोहचली. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. हा विचारवंतांचा विचार सानिकाने आपल्या मानवी मनावर गोंदुन घेतला आहे. कपाळावर लिहीलेलं नशिब टाचेवरच्या भेगांशिवाय पुर्ण होत नाही. ही मायबापांनी दिलेली शिकवन ती प्रत्यक्ष आचरणात आणुन, दिवसरात्र पुस्तकात डोळे खुपसून अभ्यास करते आहे.

दारिद्र्य, वाढती महागाई, निराधारता, भुक, आणि न परवडणारे आजार, आदी नानाविध व्याधींनी परिवार उद्ध्वस्त झाला असतांना सुध्दा सानिकाने दहावीच्या परिक्षेत मारलेली बाजी कौतुकास्पद आहे. याचीच गांभीर्याने दखल घेत, महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी थेट विधानभवनातुन दूरध्वनी द्वारे संपर्क करुन सानिकाचे अभिनंदन करुन कौतुकाची थाप मारली असुन बेटा…सानिका मी तुझ्या घरी येऊन तुझे अभिनंदन करेन! असा आशावादी संदेश दिला आहे.