महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष ची झुम मिटींग घेऊन आढावा बैठक संपन्न

40

 

अकोट प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी महीला काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी आयोजित मिटींग
दि. २४/०५/२०२१ रोजी ११ वा.
पक्षाच्या खा. आ. सुप्रीयाताई सुळे यांच्या उपस्थितीत कोविड १९ आाणि वाढत्या कौटुंबिक हिंसाचार या विषयावर झुम मिटींग घेऊन सेमिनार आयोजित केला.
या मध्ये महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या ५०० महिला यात सहभागी झाल्या. या मिटींग चे प्रमुख मार्गदशक खा. फौजीया खान, खा. वंदनाताई चव्हाण, उषाताई गराडे, डॉ.आशाताई मिरगे, आशाताई भिसे ,
यांनी महाराष्ट्रातील सहभागी झालेल्या सर्व जिल्हा अध्यक्ष व शहर अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी ,निरिक्षक, तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांना कोरोना परिस्थितीत उद्भवलेल्या कौटुंबिक हिंसाचार या संवेदनशील विषया संबंधित चर्चा केली. व यावर कायदेशीर तरतूदी, शासकीय योजना, जागतिक परिस्थिती काय आहे. असंघटीत महिला, या विविध विषयावर चर्चा झाली. यात आपल्या अकोट तालुक्यातील महिला तालुका अध्यक्ष सौ‌.शारदा कैलास थोटे व प्रदेश सरचिटणीस सौ. छायाताई कात्रे ह्या सहभागी होत्या.