शेती अवजारांची दुकाने सुरू करा तालुका काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शालिक पत्रे यांचे तहसिलदारामार्फत निवेदनातून मागणी

57

 

 

अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

आरमोरी :- अवघ्या काही दिवसात पावसाळ्याला सुरुवात होत आहे शेतकरी शेती करण्याचे संबंधानेकामास लागलेला आहे. परंतु कोरोना महामारी मुळे शेती अवजारे व ट्रॅक्टर ला लागणारे स्पेअर पार्ट दुकान पूर्णता बंद असल्यामुळे ट्रॅक्टर बंद अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे शेती अवजारांची दुकाने सुरू करावी अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शालिक पत्रे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.
सध्या शेती ही साधारणतः 80 टक्के ट्रॅक्टरने किंवा ट्रॅक्टर वर चालणारे अवजाराने केली जाते. शेती अवजारांना दुकानाला लॉक डाऊन मधून सूट दिली तर ट्रॅक्टर द्वारे शेती मशागतीची काम करणे सोपे होईल.
ट्रॅक्टरला सामानाची अत्यंत आवश्यकता असते. लॉक डाऊन मुळे स्पेअर पार्ट व्यापारी छुप्या मार्गाने अव्वाच्या सव्वा किमती लावून सामान विक्री करीत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड बसत आहे या सर्व बाबीचा विचार करता लवकरात लवकर शेती अवजारे व ट्रॅक्टरला लागणाऱ्या सामानाची दुकाने सुरू करण्यात यावी. कोरोना महामारी च्या संबंधाने नियमांचे पालन करण्याची सूचना देऊन त्या पद्धतीने सामान कसे विकता येईल, आणि शेतकऱ्यांचा त्रास कसा कमी होईल, तसेच शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक कशी थांबेल. यासाठी विचारपूर्वक योग्य तो निर्णय घ्यावा. अशी ही मागणी शालिक पत्रे यांनी केली आहे.