खोडके परिवारांचा सामाजिक उपक्रम बापलेक धावून आले गोरगरिबांसाठी

42

 

अकोट प्रतिनिधी

लाकॅडाऊन काळात सामाजिक बांधिलकी जपत गोर गरीब जनतेची सेवा धामणा बु. येथील पूर्णाजी खोडके व पूर्णा खोडके मित्र परिवार यांचा उपक्रम. कोरोणा चे काळात प्रत्येक नागरिक आप आपल्या परिने अडचणी असलेल्या नागरिकांना मदत करत आहे यामध्ये पोलिस डाक्टर समाजसेवक पत्रकार सुद्धा मदतिचा हात घेऊन समोर येत आहेत, यामध्ये अकोट तालुक्यातील धामणा बु. येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते पूर्णा खोडके यांनी सुध्दा आपले कोरोणा काळात सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा आदर्श निर्माण करुन त्यांचे कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अकोला जिल्हामध्यें गेले काही दिवसांपासून कडक लाॅकडाउन जाहिर केला यामध्ये सर्व किरणा दुकाने घरपोच सुविधा चालू ठेवली, परंतु नागरिकांचा हाताला काम नसल्यामुळे गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली.अनेकाचे रोजगार ठप्प झाले त्यामुळे पोट पाण्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने अशा कुटुंबांची माहिती पत्रकार सामाजिक कार्यकर्ते पूर्णा खोडके व त्यांचे वडील डॉ. निरंजन खोडके यांनी पुढाकार घेत गरजूंना धान्य वाटप केले , तसेच गरजूंना घरी गहु ,साखर, मिरची व कांदे, लसूण वाटप व शनि टायझर वाटप करण्यात आला . त्यामुळे त्यांना जेवणाची सोय झाली.