विशेष बाब म्हणून शासनाने रत्नागिरी जिल्ह्याकडे लक्ष द्यावे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रशांत यादव यांची मागणी तोक्ते वादळातील नुकसानग्रस्त बांधवांच्या मदतीला प्रशांत यादव सरसावले.

58

 

प्रतिनिधी : (ओंकार रेळेकर)

चिपळूण : तोक्ते वादळात रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी ,आंबा बागायतदार आणि मच्छिमार यांच्या झालेल्या अतोनात नुकसानी कडे महाराष्ट्र शासनाने विशेष बाब म्हणून लक्ष द्यावे अशी मागणी चिपळूण तालुका काँग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे .तोक्ते वादळातील नुकसानग्रस्त बांधवांना शासनाची मदत मिळवून देण्याकरिता प्रशांत यादव सरसावले आहेत.
लागोपाठ दुसऱ्या वर्षी ऐन हंगामात आलेल्या भीषण तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे,शेतकरी,मच्छिमार बांधवांचे पुरते कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने
नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून आंबा बागायतदार व वादळग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी शनिवारी रात्री रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.तोक्ते वादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करणासाठी पटोले यांचा शनिवार पासून कोकण दौरा सुरू झाला आहे.चिपळूण तालुका काँग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मतोश्रीचे नुकतेच निधन झाले कोकण दौऱ्यावर आलेले नाना पटोले यांनी शनिवारी रात्री यादव यांच्या निवस्थानी सांत्वनपर भेट दिली या वेळी यादव यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी आंबा बागायतदार,मच्छिमार यांच्या वादळात झालेल्या नुकसानीची माहिती देऊन शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी करून निवेदन दिले. कोकणातील हंगामी उत्पन्नाचे सर्व मार्ग तौक्ते चक्रीवादळाने हिरावून घेतले. कोकणी अर्थव्यवस्थेस यापूर्वी कधीही बसला नव्हता एवढा जबर फटका या चक्रीवादळामुळे बसला आहे. कोकणाबरोबरच पश्चिम
महाराष्ट्रातही आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या वर्षी सुध्दा निसर्ग चक्रीवादळात कोकणातील
शेतकरी उद्धवस्त झाला. अवकाळी पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान केले. त्यावेळी
राज्य सरकाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक
मदतीची घोषणा केली होती. त्यावर शासकीय यंत्रणेने
तातडीने पंचनामेही केले. मात्र राज्य शासनाच्या या
मदतीचा अद्याप अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला
नाही शासकीय मदतीपासून वांचित असलेल्या शेतक-यांना यावर्षी तौक्ते चक्रीवादळाने
तडाखा दिला असून त्यामध्येही त्यांचे प्रचंड
नुकसान झाले आहे. कोरोना महामारी सुरू आहे.
त्यामुळे या गंभीर परिस्थितीत येथील आंबा
बागायतदार, शेतकऱ्याला सावरणे गरजेचे आहे.
उद्धवस्त कोकणास पुन्हा उभी करण्यासाठी आता
थेट मदत मिळावी, अशी मागणी श्री. प्रशांत यादव
यांनी दिलेल्या निवेदनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

*फोटो* : नाना पटोले यांना निवेदन देतांना प्रशांत यादव,सोबत माणिक जगताप,फैसल पिलपिले,रुपेश आवले, वासुदेव मेस्त्री आणि कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत

*दखल न्यूज भारत*