भारत-पाक बॉर्डरच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न

0
109

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : मुंबई येथील कुर्ला एल.बी. एस. मार्गावरील वरील श्री सिद्धिविनायक गणेश चित्र शाळेत भारत-पाकच्या राजाची मूर्ती साकारण्यात येत आहे. भारत-पाक सीमेवर विराजमान होणाऱ्या या गणेशाची मूर्ती दरवर्षी मुंबईतून काश्मीरला नेली जाते. यंदाचे हे मूर्तीचे अकरावे वर्ष आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील पुंछ जिल्ह्यात विराजमान होणाऱ्या राजाचा पाद्यपूजन सोहळा नुकताच साधेपणाने संपन्न झाला परंतु या वर्षी कोरोना सारखे मोठे संकट संपूर्ण जगावर असल्या कारणाने यावेळी फक्त ठराविक सभासद यांच्या उपस्थितीत आणि सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क, सॅनिटायझर वापरून भारत पाक बॉर्डरच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला
भारत पाक सीमेवरील पुलस्त नदीच्या तटावर वसलेल्या भारताच्या अंतिम गावातील रहिवासी ईशरदिदी – मानव अधिकार कार्यकर्त्या , प्राचीन शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्ट उपाध्यक्ष तसेच मुंबईतील समाजसेवक छत्रपती आवटे, व प्रोग्रेसिव नेशन एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने या गणेश मुर्तीला मुंबईहून पुंछ ला पाठविले जाते. या उत्सवात विराजमान होणाऱ्या गणेशाला भारत-पाक बोर्डरचा राजा तसेच किंग ऑफ एलओसी म्हणून संबोधले जाते. या वर्षी महाराष्ट्र सरकारने ज्या नियम अटी घातल्या आहेत त्याचे पालन करून दोन फुटाची मनमोहक सुबक हिरेजडीत मूर्ती साकारण्याचे काम मूर्तीकार विक्रांत पांढरे हे आपल्या लाल बहादूर शास्त्री मार्ग कुर्ला येथील श्री सिद्धिविनायक गणेश चित्र शाळेत साकारत आहे.