पत्रकार संरक्षण समितीच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब सुतार यांची निवड.

26

 

निरा नरसिंहपुर दिनांक २४ प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार.

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पत्रकार बाळासाहेब बाबुराव सुतार यांची पत्रकार संरक्षण समितीच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी निवड नियुक्तीपत्र देऊन नुकतीच करण्यात आली .
पत्रकार संरक्षण समितीचेेे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे साहेब, तसेच महाराष्ट्र्राज उपाध्यक्ष अनिल चौधरी साहेब,

व पुणे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे साहेब, या सर्वांच्या सूचनेनुसार  इंदापूर तालुका पत्रकार संरक्षण समितीच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब सुतार यांची नियुक्ती पत्र देऊन नेमणूक करण्यात आली. बाळासाहेबांचे आई व वडील कैलास वासी बाबुराव सुतार व ७ बंधूंचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी असतो. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त नोंदणी क्रमांक महा 027/16 सी आर क्रमांक–f 18386( महाराष्ट्र) मान्यता असलेले एकमेव संघटना आहे.

पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवडीनंतर पत्रकार बाळासाहेब सुतार पुढे म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांवर होणारा अन्यायाला न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत राहील संघटनेच्या माध्यमातून अनेक कामे केली जातील. पत्रकार समितीच्या नियमाचे पालन करीन .पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष  उपाध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष  व सर्व पदाधिकारी आणि इंदापूर तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमीच असल्यामुळे मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करीत आहे.

———————————————–

फोटो:- पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सुतार

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160