आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांची वेठबिगारी थांबवा…… अन्यथा 26 मे पासून कोविड-19 विषयक कामावर बहिष्कार …..तर 15 जून पासून राज्यव्यापी संप….. आयटक चा इशारा……

185

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

ब्रम्हपुरी:–आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना कोरोना काळात नियमित कर्मचाऱ्या प्रमाणे राबविले जात आहे. परंतु त्या प्रमाणात योग्य मोबदला दिला जात नाही. उलटपक्षी त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी अधिकाऱ्याद्वारे दिली जाते, या पार्श्वभूमीवर 26 मे 2021 पासून कोविड-19 विषयक कामावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे तर 15 जून पासून राज्यव्यापी संप करण्याचा इशारा आयटक संघटनेचे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे.

आज दि.24 ला तालुका आरोग्य अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्फत आशा व गट प्रवर्तक महिलांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन द्वारे कळविले आहे आणि संपूर्ण चंद्रपूर जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना नोटीस द्वारे को रोना -19 विषयक कामावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची सूचना दिली आहे.

आशा कर्मचारी मागील एक वर्षा पासून कोरोना अनुसंघाने अनेक कामे नियमित करीत आहेत. अनेकदा कोरोना सर्वेक्षणाला गेले असता त्यांच्यावर शिवीगाळ व हल्लेही झाले आहेत, कोविड प्रादुर्भावा च्या काळात सक्षम आणि समर्थपणे सेवा देणाऱ्या या कामगारांना ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरविण्यात आले आहे. मात्र त्यांना गरजेपुरता मोबदला मिळाला नाही, तर फक्त दिवसाला 33 रू.देऊन त्यांच्या कडून वेठबिगारी चे काम करवून घेतल्या जात आहे. सध्या सुरू असलेल्या महामारिमुळे महाराष्ट्रात अनेक आशा वर्कर ला आपले प्राण गमवावे लागले आहेत. परिणामतः अनेक आशा वरकर्चे कुटुंब उघड्यावर पडले असून मुले पोरकी झाली आहेत. ही सर्व स्थिती पाहता आशा कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला देण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून व आपल्या हक्काचा दाम मिळावा म्हणून नाईलाजास्तव आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी 26 पासून कोविड-19 कामावर बहिष्कार तर 15 जून पासून राज्यव्यापी संप करावा लागत आहे.

सदर निवेदनात कामाचा वाढता ताण आणि आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता राज्य सरकारने व गट प्रवर्तक यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.किमान 22 हजार रुपये वेतन घ्यावे. आशा वर्कर ला सर्व सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी. सर्व महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामीण विभागातील आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना प्रतिदिन 300 रू.मानधन द्यावे. ग्रामविकास खात्याच्या व नगर विकास खात्याच्या शासकीय परिपत्रक नुसार ग्रामपंचायत च्या उपलब्ध निधीतून आशा व गट प्रवर्तक यांना मासिक 1000 रू.प्रोत्साहन भत्ता मागील एप्रिल 2020 पासून फरकसहित देण्यात यावा. तर नगर परिषद व नगर पंचायत अतर्गत नागरी भागातील आशा व गट प्रवर्तक महिलांना सुधा मासिक 1000 रू. फरका सहित देण्यात यावे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा मोबदला आशा व गट प्रवर्तक यांना देण्यात यावा. राज्य शासनाच्या विमा कवच योजनेत संबंधितांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात यावा. पोलिओ, कुष्ठरोग, क्षयरोग आणि सांसर्गिक रोग यांच्या सर्वेक्षणाचा थकीत मोबदला देण्यात यावा. कोरोना बाधित झालेल्या आशा व गट प्रवर्तक व त्यांच्या कुटंबियांसाठी उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर सह बेड राखीव ठेवण्यात यावे व त्यांचा विनामूल्य उपचार देण्यात यावा.आशा व गट प्रवर्तक यांना मास्क, हांडगलोज, सानिटाईझर ची नियमित पूर्तता करण्यात यावी व आक्सिजन, तापमान मीटर यांत्रसाठी आवश्यक असणारे सेलही मुबलक प्रमाणात देण्यात यावे. गट प्रवर्तक महिलांना कार्यक्षेत्रात दौरे करण्यासाठी शासनाने स्कुटी देण्याचे जाहीर केले होते त्याची तातडीने पूर्तता करण्यात यावी. आरोग्य सेविका पदभरती मध्ये आशा व गट प्रवर्तक महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात यावे यासह आदी विविध मागण्या आयटक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रम्हपुरी येथील आरोग्य कार्यालयात निवेदन देतांना आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या तालुका अध्यक्ष कॉ.जोसना ठोंबरे, हिरकण्या सोवडणे, विश्रांती नवताग, वैशाली बनकर, हिमानी वाघमारे, उषा रामटेके, अश्विनी कांबळे, आशा बनकर, सीमा शेंडे आदी तालुक्यातील आशा व गट प्रवर्तक महिला उपस्थित होत्या.