कांद्री चा युवक ऋृषभ वैद्य नागपुर येथे हरवला.

141

 

कन्हान : – कांद्री येथील रहिवासी सुनिता मधुकर वैद्य यांच्या मुलगा ॠषभ मधुकर वैद्य यांची मानसिक स्थिति खराब असल्यामुळे उपचाराकरिता नागपुर ला नेले असता तो लोकमत चौकातुन लापता झाल्याने शोध घेतले असता मिळुन न आल्याने मुलाच्या आई ने सिताबर्डी पोलीस स्टेशन नागपुर येथे हरविल्यांची तोंडी रिपोर्ट दिली आहे.
कांद्री- कन्हान येथील सुनिता मधुकर वैद्य वय ४३ वर्ष हया आंगनवाडी मदतनीय म्हणुन काम करीत असुन मंगळवार दि.१८ मे २०२१ ला दुपारी १२ वाज ता च्या दरम्यान त्यांच्या मुलगा ॠषभ मधुकर वैद्य वय १९ वर्ष यांची मानसिक स्थिती खराब असल्याने लोक मत चौक नागपुर येथे डॉ चंन्द्रशेखर मेश्राम यांच्या दवा खान्यात उपचाराकरिता नेले असता तो डॉक्टर च्या दवाखान्यात न येता सोबत असलेले संभाजी तुकाराम मस्के वय ५१ वर्ष रा. कांन्द्री यांच्या हाताला झटका मारून पळुन गेला. त्याचा आजु बाजुला शोध घेतला असता मिळुन न आल्याने आई सुनिता मधुकर वैद्य यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे हरवल्याची तोंडी रिपोर्ट दिली आहे. या मुलाचे वर्णन असे कि अंगात पांढरा फुल शर्ट त्याला काळी बटन व स्काय ब्लू जिंस पॅन्ट घातलेला असुन पायात शॅंन्डल घातली आहे. उंची ५ फुट, ६ इंच, साधारण केस काळे पांढरे, दाडी बारीक , मराठी बोलतो, वर्ण – सावळा, चेहरा – गोल, बांधा- साधारण आहे. पुढील तपास सीताबर्डी पोलीस नागपुर करित असुन कुणालाही मिळुन आल्यास पोलीस स्टेशला किंवा त्याती आई सुनिता वैद्य कांद्री-कन्हान मो न ८७८८०७३४१६ वर फोन करून संपर्क साधावा.
१) हरवलेल्या ऋृषभ वैद्य चा फोटो.