Home चंद्रपूर  सागर खोब्रागडे यांचे कडून गिरगाव वाचनालयला पुस्तके संच भेट वाढदिवसाचे औचित्य साधून...

सागर खोब्रागडे यांचे कडून गिरगाव वाचनालयला पुस्तके संच भेट वाढदिवसाचे औचित्य साधून दिले पुस्तके भेट

397

 

प्रतिनिधी/शुभम पारखी
7218216140

गरीब विद्यार्थी मोठं मोठे पुस्तके विकत घेऊ शकत नाही,त्यांना शिक्षणाची आवड असते परंतु त्यांच्या परिस्थितीमुळे ते विद्यार्थी पुस्तके विकत घेऊ शकत नाही.या करिता गिरगाव ग्रा.पं. ने काहीं महिन्यापूर्वी वाचनालय सुरू केले. त्या वाचनालयाला गिरगाव-वाढोना जि.प.क्षेत्राचे युवक काँग्रेसचे सोशल मिडिया प्रमुख, नेहमी समाज कार्यात अग्रेसर असणारे, युवा पदाधिकारी सागर खोब्रागडे यांनी आपल्या स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाचनालयाला निट, एम.एच.सी.ई.टी., स्पर्धा परीक्षांचे असे विविध अभ्यासक्रमांचे पुस्तकांचा संच त्यांनी आपल्या स्वखर्चातून वाचनालयाला भेट दिलीत.
सागर खोब्रागडे हे नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी दिलेल्या या पुस्तकांचा विद्यार्थ्यांना अवश्य लाभ होईल यात काहीं शंकाच नाही.या वेळेस नागभीड तालुका काँग्रेस कमिटी चे सचिव श्री.विनोदभाऊ बोरकर,गिरगाव ग्रा.पं.चे सरपंच श्री.प्रशांत गायकवाड, पं.स.युवक काँग्रेस प्रमुख श्री.सुधीर बोरकर, श्री.अविनाश मांदाळे, श्री. प्रशांत राऊत व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. त्यांच्या या कार्यासाठी ग्रा.पं.चे पदाधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आभार मानले.

Previous articleमंगरुळपीर नगरपरिषदेचा नागरीकांच्या जिवाशी खेळ,हजारो लिटर पाणी रस्त्यावर
Next articleभारत-पाक बॉर्डरच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न