शेतकरी आंदोलन तुमसर मध्ये खा.सुनील मेंढे व माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक

68

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

भंडारा- नागपूरात बसून गप्पा करणाऱ्यांनी प्रत्यक्ष वास्तविकता जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात यावे. धान खरेदी केंद्र सुरू झाले, बोनस दिला गेला असे सांगणार्‍या नेत्यांनी वास्तवाची जाणीव ठेवावी. खोटे बोलून शेतकऱ्यांना भूलथापा देण्याचे काम बंद करावे. आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत. टाळेबंदी चे कारण सांगून पोलिसांच्या माध्यमातून नोटीस देऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य शासनाने आधी शेतकर्‍यांच्या न्याय मागण्या मान्य कराव्या नाहीतर हे आंदोलन असेच मागण्या पूर्ण होईतो सुरू राहील. शेतकऱ्यांचे नेते पूत्र म्हणविणारे आज झोपले आहेत. केवळ घोषणा करू नका, त्या कृतीतून दाखवून द्या. तुमसर येथे भाजपच्या वतीने आयोजित शेतकरी मागण्यांच्या रास्ता रोको आंदोलनात बोलताना सरकारवर भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी टीका केली. यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष शिवरामजी गिर्हेपुंजे, तारिकजी कुरेशी, माजी आमदार चरणभाऊ वाघमारे व कार्यकर्ते , शेतकरी बंधू उपस्थित होते.तुमसर भंडारा रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून अटकही करण्यात आली.