या…..महिन्यापर्यंत भारतातुन पूर्ण कोरोना हद्दपार होणार ? : युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड डिझाइनचा दावा

175

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

मुंबई : कोरोनाचा हाहाकार पाहता, लोक घाबरुन गेले आहेत. अशावेळी जर कोणी म्हटले की कोरोना एका महिन्यात संपुष्टात येणार आहे. या सारखी दिलासा देणारी दुसरी बातमी नसेल. मात्र, आपण यावर विश्वास ठेवाल का? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एखाद्या पोस्टवर जर विश्वास ठेवायचा झाले तर सिंगापूरमधील एका विद्यापीठाचा हवाला देत असे म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले आहे, 18 जूनपर्यंत भारत कोविड -19 या आजारापासून पूर्णपणे मुक्त होईल.
18 जूनपर्यंत भारत कोविड -19 या आजारापासून पूर्णपणे मुक्त होईल. जगातील 131 देशांमध्ये कोरोनावर सर्वेक्षण करण्यात आले आणि भारताच्या अहवालानुसार 21 मे पर्यंत भारत कोरोनापासून 97 टक्के मुक्त होईल. 18 जूनपर्यंत भारत कोरोनापासून पूर्णपणे मुक्त होईल. असा दावा सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड डिझाइनने केला आहे. हे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केले गेले आहे. रुग्णांची संसर्ग आणि पुनर्प्राप्ती आधारभूत आहे. 8 डिसेंबरपर्यंत जगातून कोरोना विषाणूचा नष्ट होईल. इटली आणि स्पेनविषयी या विद्यापीठाचा डेटा अचूक आहे.”

सिंगापूर विद्यापीठाने केलेल्या संशोधनाद्वारे ज्याचा दावा केला जात आहे, ते एका वर्षापूर्वी केले गेले होते. त्यामध्ये हे स्पष्टपणे लिहिले होते की कोविड -19 संबंधित आकडेवारी बदलल्यास हे निकालही बदलतील.