कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खल्लार येथे आढावा बैठक व रोगनिदान शिबिराचे आयोजन

183

खल्लारवरुन(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत असलेला प्रसार रोखण्यासाठी, वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी व या रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी खल्लार सर्कलचे जि प सदस्य सुनिल डिके यांच्या अध्यक्षतेखाली व दर्यापूरचे तहसिलदार डॉ योगेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 24 मे रोजी आढावा खल्लार येथील जि प शाळेत आढावा बैठक व रोगनिदान शिबिर घेण्यात आले
या शिबिराला खल्लार जि प सदस्य सुनिल डिके, दर्यापूर तहसिलदार डॉ योगेश देशमुख, खल्लार पो स्टे चे दुय्यम ठाणेदार अनंत हिवराळे, सरपंच योगेश मोपारी, चंद्रपूर प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ उन्मेष रोडे, मंडळ अधिकारी पवार, तलाठी वसु, खल्लार ग्रा पं चे सर्व सदस्य, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, उपस्थित होते