काद्री च्या युवकाची माहुली डोलामाईट कंपनी श्रेत्रात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

303

 

 

पारशिवनी (ता प्):-घरघुती वादातून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पारशिवनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माहुली गावातिल डोलामाईन परिसरात रविवारी (२३ मे) सकाळी उघडकीस आली. मृतकाचे नाव अश्‍वीन उर्फ मिंटू शारदाप्रसाद त्रिपाठी (वय ३८, रा. कान्द्री कन्हान) आहे. मृतक शनिवारी सायंकाळी घरून रागात निघून गेला होता. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही कुठेही शोध लागला नव्हता. रविवारी सकाळी १0 च्या सुमारास माहुली जवळील डोलामाईन परिसरातील शिवमंदिरजवळ तो झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत काही शेतकर्‍यांना आढळून आला. लागलीच घटनेची माहिती पारशिवनी पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पुढील तपास पारशिवनी पोलिस करीत आहे