सिरोंचा तालुक्यात अतिरिक्त तेंदूपत्ता संकलन,वनविभागाचे दुर्लक्ष शंकाजनक… — ठेकेदारावर कारवाई अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची संपादक जगदीश वेन्नम यांची मागणी!..

89

 

दखल न्युज भारत..

गडचिरोली: गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल्य व भरपूर जंगल व्याप्त असलेला जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.
सध्या सिरोंचा तालुक्यात तेंदूपत्ता हंगाम जोरात चालू आहे. या भागात चागल्या प्रतीचा तेंदू पत्ता मिळतो म्हणून या तेंदूपत्ता ला बाजारात चांगली मागणी आहे.हा भाग आदिवासी बहुल्य असल्यामुळे व तेंदूपत्ता वेतिरिक्त या भागात दुसरा कोणताच मोठा रोजगार नसल्यामुळे याच तेंदूपत्ताच्या हंगामात येथील लोक वर्षभराच आर्थिक बजट बसवीत असतात.
याचाच फायदा घेत तेंदूपत्ता ठेकेदार,ग्राम समिती सोबत केलेल्या करारापेक्षा जास्त तेंदूपत्ता संकलन करतात व संकलन केलेला तेंदूपत्ता ते घेऊन जातात.
कारारापेक्षा अतिरिक्त तेंदूपत्ता संकलन करण्याची मुभा ठेकेदारांना नसताना,ते जादा तेंदूपत्ता संकलनाचे काम करतातच कसे?हा प्रश्न भ्रष्टाचाराला खतपाणी घालतो आहे.परत्वे जादा संकलन करण्यात आलेला तेंदूपत्ता घेऊन जाण्यासाठी वन विभाग व ठेकेदार यांच्यात खलबते झाले असून,जादा तेंदूपत्ता माल ठेकेदार बिनधास्त नेतांना दिसत आहेत.
यात नुकसान मात्र निरपराध भोळ्याभाबड्या आदिवासी लोकांची होत आहे.तसेच जंगलातील भरपूर वृक्ष तोड होत असताना दिसत आहे.ठेकेदारांच्या फायद्यासाठी टेंभूर वृक्ष तोडी कडे वन विभागाने पाठ फिरवली असल्याचे सर्वत्र चित्र आहे.
अतिरिक्त आणि चोरीने जाणारा तेंदूपत्ता माल लाखोंच्या घरात आहे.म्हणून निरापराध आदिवासी लोकांची दिशाभूल करून अतिरिक्त तेंदूपत्ता घेऊन जाणाऱ्या तेंदूपत्ता ठेकेदारावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा,अशी मागणी दखल न्युज भारत चे संपादक जगदिश वेन्नम करीत आहेत.