आ.सुधिरभाऊ मुंनगटीवार फॅन क्लब तर्फे गरजुना भाजीपाला व धान्याचे वाटप

90

 

दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली
तालुका प्रतिनिधि, बल्लारपुर

बल्लारपुर:संपूर्ण भारत देश हा सध्या कोरोना ( कोविड – १९ ) या महामारी पासून व्यापला आहे .संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . या महामारी ने संपूर्ण राज्याला एका भीती निशी जगायला भाग पाळले आहे. कामकाज सोडून जनतेला घरी राहायला भाग पाळत आहे. अशात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील गरिबांना अन्नाची कमतरता न भासावी त्यांना उपाशी पोटी न राहावे लागेल या जाणीवेतून बल्लारपूर मधील सामान्य जनतेसाठी नेहमी मदतीला धावून येणारी सामाजिक संघटना आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर ने पुन्हा एकदा मदतीचा हात हा सामान्य जनतेसाठी पुढे केला आहे. आ.सुधीरभाऊ फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे गरजू लोकांना भाजीपाला तसेच धान्याचे किट वाटप करण्यात आले जेणेकरून येणाऱ्या काळात त्यांना कोरोना या महामारीपासून बचाव करता येईल. या समाजसेवा कार्यात आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, सुधाकर सिक्का,अनिकेत पोतर्लावार, आदर्श पोतर्लावार,कार्यकर्ता उपस्थित होते.