बेलसरे कुटूंबियांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केला मुलाचा वाढदिवस साजरा. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना केले चहा, नाश्ता व बिस्किटाचे वाटप.

269

 

आष्टी प्रतिनिधी प्रविण तिवाडे

गडचिरोली-
शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी आपला मुलगा अर्जुन याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाततील कोरोनाबधित व इतर रुग्णांच्या नातेवाईकांना 24 मे रोजी सकाळी नाश्ता, चहा व बिस्किटाचे वाटप केले.

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यच्या दुर्गम भागातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक येतात.या कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 15 मे पासून शिवसेनेच्या वतीने चहा,नाश्ता व बिस्किटाचे वाटप करण्यात येत आहे. बेलसरे कुटूंबियांनी सामाजीक बांधिलकी जोपासत याच सेवाकार्याला मदत म्हणून आपला मुलगा अर्जुन याच्या वाढदिवशी नाश्ता, चहा व बिस्किटांचे वाटप करून माणुसकी जोपासली व एक चांगला संदेश दिला.

या प्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय श्रुंगारपवार,शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे,उदय धकाते, मंगेश पोरटे, आष्टीचे ग्रामपंचायत सदस्य संतोष बारापात्रे,शिव श्रुंगारपवार उपस्थित होते.