मंगरुळपीर नगरपरिषदेचा नागरीकांच्या जिवाशी खेळ,हजारो लिटर पाणी रस्त्यावर

303

 

मंगरूळपीर(फुलचंद भगत)-येथील न.प.चा नियोजनशुन्य व ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असुन बिरबलनाथ मंदीराजवळील मुख्य चौकात पाईपलाईन फुटल्याने पान्याचे ऊंचच उंच फवारे वर ऊडत होते,तिथुनच गेलेल्या विजतारांपर्यत हे पान्याचे फवारे ऊडत असल्याने अपघात होन्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच ही पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी तासनतास रोडवरुन वाहत असल्याने असा पान्याचा अपव्ययही होत आहे.याविषयी समाजसेवक नितीन विटकरे यांनी प्रशासनाला कळवले असता थातुरमातुर ऊत्तरे देवुन वेळ मारुन नेन्याचा प्रकार करन्यात आला.या न.प.च्या ढिसाळ कारभाराची चौकशी करुन संबधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

फुलचंद भगत,वाशिम
मो.8459273206