लाॉकडाऊन काळात वैरागड येथे क्रिकेटचा विरंगुळा. – लॉकडाऊन मध्ये विद्यार्थी आणि व्यापारी यांना थोडाफार उसंत.

233

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड : – कोरोना महामारीचा महाप्रताप यांच्या प्रकोपामुळे त्यावर लॉाकडाऊन यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक मनावर गंभीर परिणाम पडत आहे.
लाॉकडाऊन काळात विद्यार्थी आणि व्यापारी वर्ग वैरागड येथे चौकात लोकप्रिय खेळ क्रिकेटचा विरंगुळा करीत आहे.
कोरोना (कोविड-19) महामारी दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने जमावबंदी म्हणून शाळा, दुकाने, प्रवास यावर निर्बंध लावला आहे. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांचे शाळा बंद करून ऑनलाइन अभ्यास सुरू केले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सरसकट पास करून समोरच्या वर्गात प्रवेश देणार आहे. तसेच लाॉकडाऊन याच्यामुळे विद्यार्थावर एकांतवासाचा बोजा पडला आहे.
त्याचप्रमाणे व्यापरांना सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत जीवनश्याक वास्तूचे दुकाने सुरू राहतील. शनिवार आणि रविवार दिवसभर दुकाने बंद राहण्याचा आदेश आहे. त्यावर गांव पातळीवर शनिवार आणि मंगळवार दिवस पाळण्याचे ठरविले आहे. हप्त्यातून चार दिवस काही वेळापूर्ती काम मिळून बाकीचा वेळ व्यापारांना एकांतात घालावे लागत आहे. यामुळे विद्यार्थी आणि व्यापारी वर्ग मानसिक खचला आहे. यावर थोडाफार उसंत मिळावा यासाठी क्रिकेट खेळाचा आस्वाद घेऊन वैरागड येथील विद्यार्थी आणि व्यावसायिक विरंगुळा करीत आहेत.