अजब प्रशासनाची गजब कहाणी! देवाची करणी आणि नारळात पाणी!! वणीत भाजीपाला विक्रीवर बंदी तर चिकन मटन चे दुकान सुरु आणि चाय टपरी वर बंदी तर खुलेआम दारु सुरु

55

 

वणी : परशुराम पोटे

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर टाळेबंदी व संचारबंदी दरम्यान शहरात गर्दी होणार नाही याकरिता रस्त्यावरील फळ विक्रेते व भाजी विक्रेत्यांना फिरस्ते राहुन वार्डा वार्डात माल विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या असुन सुद्धा काही फळ व भाजी विक्रेते मुख्य रस्त्यानेच आपली दुकाने थाटुन माल विक्री करीत आहेत. याला कारणही तसेच आहे, शहरात भाजी पाला दुकानांवर बंदी मात्र चिकन, मटन चे दुकान सुरु तसेच चाय टपरी वर बंदी तर खुलेआम गर्दी करुन दारु विक्री सुरु, हा सगळा प्रकार कोरोनाचा असुन यालाच म्हणतात “देवाची करणी आणि नारळात पाणी” या कोरोना काळात मानवाने अनेक बरे वाईट प्रसंग अनुभवले आहे. असाच एक प्रसंग आज अनुभवास मिळाला, कारण आज घडलेल्या घटनेत चक्क भाजीपाला विक्रेत्यांनी स्वताचेच माल भरलेले ठेले पलटी करुन, कारवाई करण्यास आलेल्या न.प.च्या अधिकाऱ्यांवर आरोप करत नुकसान भरपाईची मागणी केली. सकाळी घडलेल्या या घटनेत मोठा गोंधळ उडाला होता.
सविस्तर असे की, आज रविवारी दि.२३ मे रोजी शहरातील मुख्य रस्ता असलेल्या टिळक चौकातील जुना हैद्राबाद रोडवर भाजी विक्रेत्यांनी भाजीपाल्याचे ठेले लाऊन गर्दी केली असल्याची माहिती नगर पालिका पथकाला मिळताच पथक सदर ठिकाणी पोहोचले व उपस्थित भाजी विक्रेत्यांचे काटे जप्त करणे सुरु करताच भाजीपालेवाल्यांनी आप आपल्या दुकानाचे ठेले स्वताच पलटी करुन व स्वताचे नुकसान करुन, नगर पालीकेच्या पथकाकडे नुकसान भरपाई मागु लागल्याने एकच गोंधळ उडाला होता त्यामुळे काही वेळेसाठी रस्ता जाम झाला होता. यावेळी काही लोकांनी भाजीपाला नासाडी झाल्याचे व्हिडीओ घेऊन व्हॉटसऍप गृपवर व्हायरल केल्याने नगर पालिका प्रशासनाच्या विरोधात उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान लोकवाणी जागर,न्यूज च्या प्रतिनिधिंनी स्वता घटनास्थळी जावुन सविस्तर खबर घेतली असता रोज रोज च्या कारवाईच्या धाकाने भाजी विक्रेत्यांनी स्वताच आपले भाजीपाला भरुन असलेले ठेले पलटवुन स्वाताचेच नुकसान करत, उलट नगर पालिका प्रशासनालाच नुकसान भरपाईची मागणी करित असल्याचे आढळून आले. मात्र उफाळलेला वाद मिटविण्यासाठी पोलीस आणि नगर पालीका प्रशासनाने सावधगिरीची भुमिका बजावली.

खुलेआम दारु विक्री आणी चिकन मटन चे दुकान बंद करण्याची मागणी

एका जेष्ट पत्रकाराने प्रतिष्ठीत मिशन निर्गुडा या गृपवर शॉम टॉकीज जवळील अमृत भवन चौकात खुलेआम गर्दी करुन दारु विक्रीचा व्हिडीओ व्हायरल करून प्रशासन,पत्रकार आणी राजकिय नेत्यांच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता. तरी सुद्धा “त्या” ठिकाणी दररोज सकाळी ७ ते ११ या दरम्याण खुलेआम गर्दी करुन दारू विक्री सुरु आहेत. ईतकेच नाही तर शहरातील प्रत्येक वाईन शॉपी, दारु भट्टी यासह मोठ मोठी भंगारची दुकाने तसेच चिकन आणि मटन ची दुकाने सुरु असल्याने प्रशासनाच्या प्रती जनता नाराज असुन प्रशासन सामान्य गरीब लोकांवरच कारवाई करतात आणि मोठ्यांना अभय देतात का? असा सवाल जनता करित असुन खुलेआम दारु विक्री आणी दिवसभर सुरु असलेले चिकन मटन चे दुकान बंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.