हिवरखेड आरोग्यवर्धिनीसाठी लसीचा साठा वाढवून द्यावा … प्रेस क्लबची मागणी

36

 

अकोट प्रतिनिधी

हिवरखेड हे गाव अकोला जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचे गाव असून या गावातील आरोग्यवर्धिनीला जोडून अनेक खेडी आहेत. लसीकरणासाठी हिवरखेड गावातील नागरिक व आजूबाजूच्या खेड्यातील ही नागरिक या आरोग्यवर्धिनी ला आलेल्या लसीच्या साठ्यांवर अवलंबून आहे परंतु या आरोग्यवर्धिनी ला जोडून असलेल्या लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता आवश्यक लसीचा साठा मिळत नसल्याचे बोलल्या जाते. करिता ह्या आरोग्यवर्धिनीला हिवरखेड व परिसरातील लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता लसीचा त्या प्रमाणात साठा मिळावा अशी मागणी प्रेस क्लबच्या वतीने करण्यात येत आहे. आरोग्यवर्धिनी हिवरखेड चे मागील कोविड १९ च्या लसीकरण मोहिमेतील नियोजन पाहता ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य,कर्मचारी, सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संघटना यांच्या सहकार्याने योग्य नियोजन झालेले आहे. लसीकरण करिता आलेल्या नागरिकांना कोणतेही प्रकारे त्रास होऊ नये ,याकरिता *प्रेस क्लब* या सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या या पत्रकार संघटनेच्या वतीने उन्हाच्या त्रासापासून बचाव व्हावा याकरिता सभामंडप व पिण्याच्या थंड पाण्याची व् लसीकरणासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी मोफत नोंदणी सुद्धा करून देण्यात आली होती हिवरखेड आरोग्यवर्धिनी सारख्या मोठ्या आरोग्य केंद्रात लसीचा साठा या आरोग्यवर्धिनीला जोडून असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात देण्यात यावा जेणेकरून त्याचे योग्य नियोजन होऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होईल. हिवरखेड या गावाची लोकसंख्या घेता गावात कोरोना या विषाणूच्या पादुर्भाव संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी लसीकरण मोहिमेअंतर्गत हिवरखेड या गावाला प्राधान्यक्रम द्यावा, अशी मागणी सुद्धा जोर धरीत आहे.