घुग्घुस येथील रामनगर वार्डातील विलगीकरण क्षेत्रात धान्यकिट वाटप

193

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
घुग्घुस येथील रामनगर वार्डातील अलगीकरण क्षेत्रात आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मित्रा टीम वणी एरिया तर्फे धान्यकिटचे वाटप करण्यात आले. काही दिवसापुर्वीच रामनगर वार्डात कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्याने आठ घरांचे अलगीकरण करण्यात आले होते सामाजिक बांधिलकी जोपासत येथील गरजु कुटुंबीयांना धान्यकिटचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, सिनु इसारप ग्रापं सदस्य, श्रीकांत सावे, बबलु सातपुते, टीम मित्रा ग्रुपचे सदस्य सुशांत वाघ, घनश्याम छानीकर श्री रवी जाधव, शनी भारद्वाज उपस्थित होते.