वाशिम जिल्ह्यातील नृत्य कलाकारांना नृत्य परिषद महाराष्ट्र राज्य विदर्भ विभागाच्या वतीने मदतिचा हात

58

 

वाशिम प्रतिनिधी // आशिष धोंगडे

वाशिम (प्रतिनिधी) : नृत्य परिषद महाराष्ट्र राज्य, विदर्भ विभाग यांच्या वतीने एकल नृत्य स्पर्धा एकलविष्कार २०२१ सोहळा ऑनलाइन घेण्यात आला असून , सर्वतर कोरोना वैश्विक महामारी ने सगळ्यांचे जगने अवघड होऊन बसले आहे . पाहिला लोकडॉउन संपल्या नंतर जगण्याची आशा पालवी पकडून लागत असतांना कोरोनाच्या दुसऱ्या आक्रमनाने पुन्हा लोकडॉउन म्हणजेच ब्रेक द चैन नव्या संकटाला आपल्याला समोर जावे लागत आहे .समाजातील विभिन्न व्यवसायांना याची झळ बसत आहे आणि त्यातील एक उपेक्षित घटक म्हणजे नृत्य कलाकार याच्या समस्ये कड़े कोणाचे लक्ष जात नाही त्याच कलाकारांना मदतिचा हात म्हणून ,नृत्य परिषद महाराष्ट्र ( विदर्भ विभाग ) मार्फ़त घेण्यात आलेल्या ऑनलाइन एकल नृत्य स्पर्धा ” नृत्याविष्कार -2021 ” च्या नोंदणी फी च्या माध्यमातून जमा झालेल्या निधितुन विदर्भातील 11 जिल्ह्यातील 70 नृत्य कलाकारांना आर्थिक मदत देण्यात येत आहे . त्या मधे वाशिम जिल्हातील दोन गरजु नृत्य कलाकार कोमल दीपक पुखवाल व सचिन चंदन पवार यांना विदर्भ विभाग प्रसिध्दि प्रमुख स्वप्नील भिसे व सदस्य गगन रॉय यांच्या मार्फ़त मदतीची राषी कलाकारांना सुपुर्त करण्यात आली अशी माहिती नृत्य परिषद विदर्भ विभागासह , प्रदिप पट्टेबहादुर वाशिम तालुका प्रसिद्धीप्रमुख नृत्य परिषद महाराष्ट्र राज्य मार्फत देण्यात आली आहे.

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत