बोर्डी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गाव झाले सिल ग्राम पंचायत व पोलिस प्रशासन यांनी केली गावबंदी……

58

 

अकोट प्रतिनिधी

आकोट तालुक्यातील ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत ग्राम बोर्डी या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हे गाव आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाने सिल केले आहे.कोरोना या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाढते कोरोना पेशंटची संख्या आटोक्यात आणण्यासाठी येथील ग्रामपंचायत वेळोवेळी दखल घेत आहे. कोरोना बाबत नागरीकांच्या मध्ये जनजागृती केली जात आहे.तसेच या मध्ये सरपंच,तलाठी,ग्रामविकास अधिकारी,पोलीस कर्मचारी,आशा स्वयंसेविका,कृषी सहायक हे आपला जिव धोक्यात घालून या कोरोनाच्या काळात सेवा देत कडक दीवटी करत आहेत.यामध्ये त्यांची फार मोठी कामगीरी आहे.तसेच आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड स्वताहा व कर्मचारीसह गावात कडक चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.यावेळी पोलीस कर्मचारी सुध्दा आपला जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पार पाडत आहेत.तर नागरीकांना कोरोना बाबत वेळोवेळी माहिती दिली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून या करीता चारही बाजूने मुख्यरस्ते पूर्णपणे गाव बंद केले आहे.डॉ फ़रीन खातुन मैडम वैद्यकीय अधिकारी बोर्डी,संतोष बुथ आरोग्यसेवक बोर्डी,अनंत मोहोकार ग्रामसेवक,राजाभाऊ खामकर तलाठी ईश्वर बैरागी कृषी सहायक,आशा सेविका,सरपंच सौ.स्वाती गोपाल चंदन,पोलीस कर्मचारी गजानन भगत,अमोल बुंदे,महिला कर्मचारी हे आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत आहेत.या गावात एकुण 20 जनांची कोरोना तपासणी पाॅझीटीव आल्याने या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गावकऱ्यामध्ये पुर्ण भितीचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने हे गाव पूर्णपणे बंद केले आहे.

*प्रतिक्रिया*
मा.जिल्हाधिकारी साहेब व ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे गावातिल चारही मुख्य रस्ते बंद केले आहेत.व बाहेरुण येणारे जाणारे यांच्या करीता कडक गावबंदी करण्यात आली आहे.

अनंत मोहोकार ग्राम सेवक बोर्डी.

*प्रतिक्रिया*

बाहेर गाव वरुण बोर्डी गावात येणारे जाणारे यांच्यावर ग्राम पंचायत मार्फत कडक लक्ष ठेवल्या जात आहे.
स्वाती गोपाल चंदन सरपंच बोर्डी