महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती अकोला तर्फे स्व खा.राजीवजी सातव यांना ऑनलाइन शोक सभाव्दारे श्रद्धांजली

114

 

अकोट प्रतिनिधी

राष्ट्रीय नेतृत्व राहिलेले, राज्यसभेचे खासदार, प्रसन्नमुद्रा राहिलेले, मनमिळाऊ स्व. राजीवजी सातव यांचे दि. 16 मे रोजी दुःखद निधन झाले. त्यामुळे माळी समाजातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रत्येकाला त्यांच्या अंतिम दर्शनाची इच्छा ओढ लागली होती. परंतु कोरोनाच्या या काळात ते शक्य झाले नाही.
आपल्या या नेत्याला महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती अकोला तर्फे ऑनलाइन शोक सभेचा कार्यक्रम संजय गोटफोडे यांनी आयोजित केला,यात समाजातील मान्यवर यांनी स्व. राजीवजी सातव यांना दोन मिनिटांची भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या ऑनलाइन शोक सभेत
मा.आ.लक्ष्मणरावजी तायडे,
महापौर सौ. अर्चनाताई मसने,
मा.आ.तुकारामजी बिडकर,
मा.आ.बळीरामजी सिरस्कार, प्रकाश तायडे, महेश गणगणे, जयंतराव मसने, ऍड. संतोष राहाटे,
मानिष हिवराळे, राजेश जावरकर, शामराव गोटफोडे, बंडूभाऊ राऊत,आत्मारामजी जाधव, प्रकाश दाते, अरविंद घाटोळ, विलासजी वरोकार, राजेशजी वानखडे, राजेंद्रजी नाथे, राजीव इटोले,निलेश काळे, गोपालजी नागापुरे, आशिषजी वासनकर, सौ. संध्याताई देशकर, ऍड सौ. कल्पना गोटफोडे, सौ. प्रणिताताई समरीतकर,सौ. अनिताताई जुंगरे, अभिलाष तायडे, निलेश तायडे, रवींद्र भिरडे, गोपालजी मसने, मोहनजी लहाने, नंदकिशोर , वासुदेवजी खोपडे, गौरव शेंगोकार, राजकुमार, रमेश शिंदे, अनिलजी पिंपळे, प्रज्वल तायडे,प्रेम आमकर, आदी समाजबांधव उपस्थित होते.